Bjp : यासाठी बागडेंनी केले शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन..

Mla Haribhau Bagde : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे हा तेजस्वी वारसा नव्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल
Mla Haribhau Bagde- Shinde-Fadanvis News, Aurangabad
Mla Haribhau Bagde- Shinde-Fadanvis News, AurangabadSarkarnanama
Published on
Updated on

Aurangabad : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दात भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे अभिनंदन केले आहे.

Mla Haribhau Bagde- Shinde-Fadanvis News, Aurangabad
Bjp News : प्रचार शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा, प्रसार पंकजांच्या नाराजीचा..

राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी शासकीय-निमशासकीय कार्यालयांत राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. (Haribhau Bagde) या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा समावेश करून सरकारने संभाजीराजांच्या अद्वितीय पराक्रमी इतिहासाचा सन्मान केला आहे. (Bjp) १४ मे रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातही छत्रपती संभाजीराजांचा जयंतीदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे शौर्य, ज्वलंत धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली अपार निष्ठा हे गुण म्हणजे महाराष्ट्राच्या तेजस्वी परंपरेचा वारसा आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे हा तेजस्वी वारसा नव्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल व स्वराज्य, स्वधर्माच्या अभिमानाचे संस्कार नव्या पिढ्यांवर घडविण्यास मदत होईल, असेही बागडे म्हणाले.

शासकीय पातळीवर राष्ट्रपुरुषांचे जयंती सोहळे साजरे करण्याची प्रथा आता परिपूर्ण झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक राज्य सरकारने बुधवारी, १८ जानेवारी रोजी जारी केले असून राष्ट्रपुरुष व महान व्यक्तींचे जयंती सोहळे साजरे करण्याच्या कार्यक्रमासंबंधी मंत्रालय तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सूचना दिल्या असल्याचे बागडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com