Devendra Fadanvis, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Ajit Pawarsarkarnama

Parbhani Loksabha News : जागावाटपात भाजपच थोरला भाऊ; राष्ट्रवादीच्या परभणीतील दाव्याचे काय ?

BJP loksabha भाजपने 'अबकी बार चारसाै पार'चा नारा दिल्याने राज्यातील जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याचा विचार आहे.

Parbhani Loksabha News : महाराष्ट्राच्या शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारमध्ये अचानक अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिनचे झाले. सरकारमध्ये सहभागी होताच अजित पवार यांची दादागिरी दिसून आली. महत्त्वाची मंत्रिपदं, शिवसेनेकडील महत्त्वाची खाती, स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थखाते आपल्याकडे ठेवत अजित पवार या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने दादा ठरले. पण, लोकसभा निवडणुका येता येता हे चित्र बदलताना दिसत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या राज्यातील दोन्ही सत्ताधारी पक्षांचा दिल्लीच्या शाहांपुढे मात्र, नाइलाज होताना दिसतो आहे. दोन्ही पक्षांचे दावे अवसान गळून पडावे तसे फोल ठरत आहेत.

मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावून ठेवली होती. आता ती वाया जाण्याच्या मार्गावर आहे. दोन आकडी जागा मागणाऱ्या राष्ट्रवादीला अगदीच चार-पाच जागा देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. अशावेळी अजित पवारांनी केलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघातील दाव्याचे काय होणार? याची चिंता त्यांच्या समर्थक आणि इच्छुक उमेदवारांना सतावते आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये भाजप हाच थोरला भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत केलेल्या मागणीचे काय होणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तीन प्रमुख पक्षांसह इतर प्रादेशिक पक्ष महायुतीमध्ये सहभागी असल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जागावाटपाच्या मुद्द्यावरून रणकंदन होणार हे निश्चित होते.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Parbhani Loksabha Constituency : परभणीत ठाकरे गट विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादीच भिडणार? दाव्यावर ठाम!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. तसेच राज्यातील तेरा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जोर लावत आहेत. राज्यातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्याचा दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या.

भारतीय जनता पक्षाने 'अबकी बार चारसाै पार' चा नारा दिल्याने राज्यातील जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ तीन जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई येथे बैठक घेऊन राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघांतील आढावा घेतला. यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश होता.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Ajit Pawar : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणार गोंदियात

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते आणि राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळे पक्षाने गेल्या अनेक महिन्यांपासून परभणी लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Parbhani Loksabha Latest News : परभणीत राष्ट्रवादी की भाजप? मुंबईत आज होणार निर्णय

जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिलेले झुकते माप, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या विशेष दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात येणाऱ्या जागांबाबत प्रसारमाध्यमात व्यक्त केलेला अंदाज पाहता परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल किंवा नाही, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Ajit Pawar News : आधी शिरूर अन् आता मंचर, अजितदादांचा कोल्हेंवर तिखटवार; 'तीन पक्ष फिरून आलेल्या बोलघेवड्याने...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com