Maharashtra Congress defeat : काँग्रेसमध्ये मोठ्या हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ३६ जिल्हाध्यक्षासह कार्यकारिणी बदलणार ?

Maharashtra, Congress introspection News : गेल्या काही दिवसापासून पक्षांतर्गत घडामोडीना वेगा आला आहे. त्यानुसार येत्या याकाळात पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे येत्या काळात या दारुण पराभवावर आत्मचिंतन केले जाणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे राज्यात तोळामासाची झालेली काँग्रेस उभारी घेईल असे वाटत होते. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका व नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानजनक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पक्षांतर्गत घडामोडीना वेग आला आहे. त्यानुसार येत्या काळात पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात 243 नगरपालीका व 45 नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्पयात पार पडल्या होत्या. त्यानंतर जवळपास 29 महापालिकाच्या निवडणुका पार पडल्या. तर शेवटच्या टप्पयात राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यापैकी नगरपालिका निवडणुकीत विदर्भात थोडेसे यश मिळाले. तर महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवली तर चंद्रपुरात हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. तर दुसरीकडे परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने उपमहापौर बसला आहे.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. लातूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असला तरी स्वबळावर बहुमतापर्यंत पोहचू शकत नाही. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्यामुळे काँग्रेसची चांगली कामगिरी असली तरी सत्तेपर्यंत पोहचता येणार नाही तर सांगली जिल्हा परिषदेतही दमदार कामगिरी करता आलेली नाही.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Shiv Sena vs BJP : माघार की कुरघोडी! संभाजीनगर झेडपीत मोठा ट्विस्ट; अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेत खटके उडणार

काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीतही मुंबई, पुणे, नाशिक या महापालिकामध्ये अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे आव्हान उभे टाकले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात तोळामासाची झालेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Nashik NCP : सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर हालचाली, हेमलता पाटील यांच्या नाराजीनाट्यावर तुर्त पडदा

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानजनक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पक्षांतर्गत घडामोडीना वेग आला आहे. त्यानुसार येत्या काळात पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून त्यांवर आता येत्या काळात राज्यभरातील 36 जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार असून त्यासोबतच जिल्हा कार्यकारिणी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी सध्या पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या बदलाकडे लागले आहे.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
BJP Vs Shivsena UBT : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मुस्लिम महापौर; भाजपने दाखवला आरसा; ही तर 'जनाब सेना' म्हणत डिवचले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com