

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवडणूक होत आहे. या मतदारसंघावर गेल्या टर्मपासूनच महायुतीचे वर्चस्व आहे. त्याशिवाय गेल्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपचे सुरेश धस हे आमदार म्हणून निवडून आल्याने या मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. याठिकाणी महायुतीमधील अन्य पक्षानी दावा देखील केला नसल्याने याठिकाणी भाजपचाच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचमुळे या मतदारसंघातून दिल्ली दरबारी चार नावे पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी एका नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यात आगामी काळात 17 जागेसाठी विधान परिषद निवडणूक होत असून त्यामध्ये जागावाटपानुसार 12 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपने (BJP) निवडणूक लढविणाऱ्या 12 मतदारसंघातील प्रत्येकी 4 या प्रमाणे एकूण 48 उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. पुढील 2 ते 3 दिवसांत दिल्लीत भाजपच्या हायकमांडकडून उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. ही यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे दोनच दिवसात या यादीमधून मतदारसंघनिहाय एक नाव फायनल करून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या नेतेमंडळीपैकी भाजपकडून चार नेत्यांच्या नावावर एकमत करून दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मंत्री व लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर व बीड जिल्ह्यातून सीएम फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व विश्वासू सहकारी ओमप्रकाश शेटे या चार जणांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्राने दिली आहे.
दिल्ली दरबारी या चार नावापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या चार जणांपैकी एक जण भाजपचा उमेदवार असणार हे जवळपास फायनल असणार आहे. त्यामुळे यापैकी उमेदवार म्हणून कोणाचे नाव फायनल होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या मतदारसंघावर गेल्या टर्मपासून भाजपचे वर्चस्व आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा कोणाला सुटणार? याकडे लक्ष लागले आहे. सध्यस्थितीत काँग्रेसकडून (Congress) गेल्यावेळी विधान परिषद निवडणूक रिंगणात उतरलेले अशोक जगदाळे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी कोण निवडणूक रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.