Chandrakant Khaire: चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाटांना पाठिंबा! निदा खान प्रकरणावरुन एमआयएम पक्षावर बंदीची केली मागणी

एमआयएम पक्षावर बंदी आणण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही खैरे यांनी सांगितले.
Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Khaire: निदा खान ही ज्या नारेगाव भागात लपून बसली होती, त्या भागात अनेक अवैध धंदे चालतात. तिथे एमआयएमचा नगरसवेक आहे आणि त्याने निदा खानला मदत केली. त्यामुळे नाशिक पोलीसांनी ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे. एमआयएम पक्षाने कायम शहरातील वातावरण खराब करण्याचे काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत औरंगाबादचा आग्रह धरण्याचे कारण काय? असा सवाल करत खैरे यांनी थेट एमआयएमवर बंदी टाकण्याची मागणीही केली.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Calcutta High Court: राहुल गांधींचा कडाडून विरोध असलेल्या प्रकरणात केंद्र सरकारला पहिला झटका; बंगालमधून आली मोठी बातमी...

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान ही सत्तावीस दिवसानंतर छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात पोलीसांना सापडली. नाशिक-संभाजीनगरच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिचा काल रात्री मुसक्या आवळल्या. या अटकेनंतर राजकारण तापले असून संजय शिरसाट यांनी निदा खान हिला लपवण्यात इम्तियाज जलील यांचाही हात आहे त्यांची चौकशी करा, अशी मागणी केली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिरसाट यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Bengal CM: अमित शहांनी फायनल केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं नाव! उद्या शपथविधी; आमदारांच्या बैठकीत 'या' नावावर शिक्कामोर्तब

हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडण्याचे मोठे षडयंत्र राज्यात सुरू आहे. एमआयएम अशा लोकांना पाठीशी घालून त्यांना मदत करते हे गंभीर आहे. नारेगावमध्ये निदा खान हिला लपवून ठेवण्यात तेथील नगरसेवक मतीन खान याने मदत केली, त्याला तर पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे. संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील व एमआयएमवर केलेले आरोप हे खरेच आहेत.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
DMK Letter: तामिळनाडूच्या सत्ताखेळाचा पहिला झटका! DMK इंडिया आघाडीतून बाहेर? लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

नारेगाव भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे केले जातात. शहरातील वातावरण एमआयएममुळे बिघडले आहे. शहरात मी खासदार असताना 28 वर्ष कधी जातीय दंगल होऊ दिली नव्हती, मात्र आता सातत्याने छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करायचा आणि वातावरण पेटवायचे, हे काम इम्तियाज जलील व त्यांचा पक्ष करतो आहे. महापालिकेत 33 नगरसेवक निवडून आल्यामुळे या पक्षाचा जोर आला आहे. मात्र खोटे प्रमाणपत्र जोडल्यामुळे त्यांच्या 8 ते 10 नगरसेवकांचे पद जाणार आहे, असा दावाही खैरे यांनी केला.

एमआयएमवर बंदी आणा...

एमआयएम पक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांचे या जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणात कनेक्शन पुढे आले आहे. इम्तियाज जलील यांनी उघडपणे निदा खान हिला भेटून तिची पाठराखण केली होती. अशा पक्षाला आणि त्यांच्या नेत्याला आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. एमआयएम पक्षावर बंदी आणण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही खैरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com