Chhatrapati Sambhajinagar News, 17 Jul : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीपैकी 40 टक्के हिस्सा संबंधित आमदारांसाठी राखीव ठेवण्याची चर्चा सुरू असून, या प्रस्तावाला जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य पंकज ठोंबरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत आमदारांसाठी निधी राखीव ठेवण्यास विरोध केला. त्यांना इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. बैठकीत अध्यक्ष अविनाश गलांडे यांनीही ठाम भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या निधीबाबत असा चुकीचा पायंडा पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी डीपीसीचा निधी महत्त्वाचा मानला जातो. यंदा जिल्हा परिषदेला सुमारे 215 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता असून, तो 63 सदस्यांच्या गटांतील विकासकामांसाठी वापरण्याचे नियोजन आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या निधीपैकी 40 टक्के हिस्सा संबंधित आमदारांसाठी राखीव ठेवण्याची सूचना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिवसेनेलाच सर्वाधिक लाभ
शहर व जिल्ह्यातील नऊपैकी 6 आमदार शिवसेनेचे आणि 3 भाजपचे असल्याने हा प्रस्ताव अमलात आल्यास शिवसेना सर्वाधिक लाभार्थी ठरेल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप या प्रस्तावाला सहज संमती देणार नसल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 22 सदस्य असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मित्रपक्ष शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले आहे. राज्यात महायुती असली तरी झेडपी निवडणुकीत हे पक्ष युती झाल्यानंतरही बहुतांश सर्कलमध्ये स्वतंत्र लढले होते. याचे उट्टे भाजपने शिवसेनेला सत्तेत न घेता स्वबळावर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद आपल्याकडे राखले आहे.
भाजपच्या या कुरघोडीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीपीडीसीतील जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधी पैकी 40 टक्के जिल्ह्यातील आमदारांना मिळावा असा निर्णय घेऊन केला आहे. परंतु भाजपने शिवसेनेचा हा डाव वेळीच ओळखत हा निर्णय हाणून पाडण्याची तयारी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.