BJP Vs Congress: अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला कर्ज मंजूर: काँग्रेसचा थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'देवाभाऊ...'

Abhimanyu Pawar Sugar Factory Gets Loan Approval : आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याच्या कर्ज मंजूरीच्या प्रस्तावाला सहकार अन् वित्त खात्याची परवानगी नाकारली होती. तरी देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने यशोमती ठाकूर यांनी CM देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Yashomati Thakur Devendra Fadnavis  Abhimanyu Pawa
Yashomati Thakur Devendra Fadnavis Abhimanyu Pawasarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur News : तब्बल 15 वर्ष बंद पडलेला किल्लारीतील नीळकंठेश्वर कारखाना सहकार कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. कर्ज मंजूरीच्या प्रस्तावाला सहकार अन् वित्त खात्याची परवानगी नाकारली होती. तरी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही परवानगी देण्यात आली. या मंजुरीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत असलेले आपले राजकीय वजन वापरल्याची चर्चा आहे.

अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फेव्हरेट आमदार म्हणून परिचित आहेत. मात्र, याचवरून काँग्रेस थेट फडणवीसांना टार्गेट केले आहे. माजी मंत्री, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी 'आपण सगळे मिळून खाऊ, आमचा नेता देवाभाऊ!', असे ट्विट करत थेट आमदार पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.

अनेक कारखान्यांचे कर्ज मंजुरीच्या प्रस्ताव मान्यता मिळावी यासाठी व्हेटींगवर असताना 15 वर्षापासून बंद असलेल्या नीळकंठेश्वर कारखान्याला मात्र सहकार विभागाचा विरोध असताना कर्ज घेण्यासाठी मंजूरी कशी मिळाली? असा थेट प्रश्न काँग्रेस नेते उपस्थित केला आहे.

Yashomati Thakur Devendra Fadnavis  Abhimanyu Pawa
Abhimanyu Pawar : CM फडणवीसांकडून लाडक्या आमदाराला मोठं गिफ्ट, सहकार अन् वित्त विभागाच्या विरोधानंतरही 18 कोटींच्या कर्जाला मंजुरी!

राष्ट्रवादीमध्ये नाराजी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील या निर्णयाबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय पटलेला नाही. परंतु हा मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.

पवारांना फडणवीसांचे पाठबळ

अभिमन्यू पवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नीळकंठेश्वर साखर कारखाना सुरू करणार असे आश्वासन दिले होते. मात्र, यामध्ये अनेक अडथळे होते. कारखाना 15 वर्ष बंद होता. त्यामुळे कर्ज कसे मंजुर होणार यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र,अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार समजले जातात. ते फडणवीस यांचे स्वीय सहायक देखील राहिलेल्या आहेत.

मान्यता का?

सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून पवार यांच्या कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मिळालेली आहे. कारखाना काही वर्ष बंद असल्याने एनसीडीसीच्या कर्जासाठीच्या निकषात बसत नाही, असे सांगत सहकार आणि वित्त विभागाने कारखान्यास शासन हमीवर कर्ज देण्यास, तसेच त्याबाबतचा प्रस्ताव एनसीडीसीलला पाठवायला विरोध केला होता. तरीदेखील त्याला मान्यता मिळाली. त्यामुळे ही मान्यता का देण्यात आली असा प्रश्न विरोधत उपस्थित करत आहेत.

Yashomati Thakur Devendra Fadnavis  Abhimanyu Pawa
Sharad Pawar Statement: दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप, शरद पवारांचं वाक्यही खटकलं; CM फडणवीसांनी एका झटक्यात मुद्दाच निकाली काढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com