Commissioner Transfer: छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांच्या बदलीला स्थगिती द्या..; नेतेमंडळी एकवटले, मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे रूजू होण्यापूर्वीच जी. श्रीकांत यांच्या बदलीला स्थगिती मिळवता येऊ शकते. त्यामुळे येडगे कधी येणार? याविषयी उत्सुकता आहे. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट हे देखील आयुक्तांच्या बदलीला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Chhatrapati Sambhaji Nagar MahapalikaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : अनेक वर्षांपासून रखडलेली शहराची पाणी योजना अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण होईपर्यंत दोन-तीन महिने महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या बदलीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यासह काही नगरसेवक मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संदर्भात विनंती करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 20-25 वर्षांत अनेक योजनांचे गाजर शहरवासीयांना दाखविण्यात आले, पण या योजना अर्ध्यावर बंद पडल्या. दुसरीकडे जीर्ण जुन्या पाणी योजनांमध्ये वारंवार बिघाड येतो. त्यामुळे शहराला सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला ऑक्टोबर 2025 ची व नंतर डिसेंबर 2025 ची मुदत पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी दिली.

दरम्यान, प्रत्यक्षात एप्रिलमध्ये शहरात पाणी येण्याची शक्यता आहे. पाणी योजना अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यासाठी महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा मोठा वाटा आहे. पाणी योजनेत ज्या-ज्या अडचणी आल्या त्यावर मात करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार जिव्हीपीआर कंपनीला मदत केली. 14 एप्रिलला पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर पुढील टप्प्यात ते शहरातील नागरिकांना एक-दोन दिवसाआड पाणी देण्याचे मोठे आव्हान आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गेल्या तीन निवडणुकीत पाण्याचा विषय गाजला. मतदार पाण्याचा विषय काढून उमेदवारांना त्रस्त करतात. त्यामुळे आता पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती असलेले जी. श्रीकांत यावेळी पाणीप्रश्‍नावर मात करतील, अशी नगरसेवकांना अपेक्षा होती, मात्र घास तोंडापर्यंत आलेला असताना शासनाने अचानक श्रीकांत यांची बदली केली. त्यामुळे नगरसेवकांना धक्का बसला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Parbhani ShaktiPeeth Mahamarg: मोठी बातमी: शेतकर्‍यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं, परभणी जिल्ह्यातला ‘शक्तिपीठ’चा मार्ग बदलणार

या बदलीला काही महिन्यांसाठी स्थगिती मिळावी, यासाठी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्याकडे विनंती करण्याची तयारी करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे रूजू होण्याच्या पूर्वीच जी. श्रीकांत यांच्या बदलीला स्थगिती मिळवता येऊ शकते. त्यामुळे येडगे कधी येणार? याविषयी उत्सुकता आहे. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट हे देखील आयुक्तांच्या बदलीला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com