Parbhani: बहुमत असूनही ठाकरेंच्या शिवसेनेचा परभणीत ठरेना महापौर; काँग्रेसमुळं जीव लागला टांगणीला!

Parbhani Mahapalika: परभणी महापालिकेत सर्वाधिक 25 नगरसेवक निवडून आणत मोठा पक्ष आणि महापौरपदाचा दावेदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर कोण? यावर अद्याप एकमत झालेले नाही.
Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Published on
Updated on

Parbhani Mahapalika News: परभणी महापालिकेत सर्वाधिक 25 नगरसेवक निवडून आणत मोठा पक्ष आणि महापौरपदाचा दावेदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर कोण? यावर अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, परभणीचा महापौर यावेळी अल्पसंख्याक समाजाचा असेल अशी जोरदार चर्चा सध्या शहरात आहे. पक्षाच्या यशात महत्वाची भूमिका वठवणारे खासदार संजय जाधव यांनी वरिष्ठ नेते ज्याच्या नावावर संमती दर्शवतील तोच महापौर असेल, असे म्हणत सस्पेंस वाढववा आहे. तर काँग्रेस पक्षाची भूमिका या सगळ्या घडामोडीत महत्वाची ठरणार आहे.

Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Sunetra Pawar Karad Visit: सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर दाखल...यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला भेट; अजितदादांची 'ही' परंपरा ठेवली कायम

परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने मिळून बहुमत गाठले आहे. आता महापौरपदी कोणाला संधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी मदत केली तरच परभणी मदत करू, अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी या भेटीत मांडल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्बत? तटकरे, पटेल यांना पदाधिकाऱ्यांचं पत्र; काय म्हटलंय पत्रात?

परभणीचा महापौर अद्याप ठरत नसल्यामागे हे एक कारण असल्याचे बोलले जाते. परभणी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गटाकडे संख्याबळ, पाठिंबा आणि सत्तास्थापनेची सुवर्णसंधी असतानाही महापौरपदाचा निर्णय मात्र अजूनही 'लवकरच' या शब्दात अडकून पडला आहे. सत्ता हातात असूनही निर्णय हाताबाहेर जातोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
BMC Elections 2026 : मुंबई महापालिकेत भाजपनं दिला निष्ठावंत मराठी चेहरा; गणेश खणकरांची गटनेतेपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाबेब ठाकरे पक्षाचे 25 नगरसेवक आणि त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे 11 नगरसेवक सध्या महापौर कोण? या एकाच प्रश्नाभोवती फिरत आहेत. काँग्रेसने आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवत शिवसेनेच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. बाहेरून पाठिंबा देणारा पक्षच जर आम्ही पाहतोय या भूमिकेत असेल, तर सत्ताधारी पक्षाची झोप उडणे स्वाभाविकच आहे. शिवसेनेकडून दिलीप ठाकूर यांची गटनेतेपदी आधीच निवड करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Hasan Mushrif: विलिनीकरणाच्या चर्चांना हसन मुश्रीफांचा दुजोरा; अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? स्पष्टच सांगितलं

तर काँग्रेसने गुलमीर खान यांच्याकडे गटनेतेपदाची सूत्रे सोपवली आहेत. मात्र गटनेते ठरले, चर्चा झाल्या, बैठका पार पडल्या तरीही महापौर आणि उपमहापौर पदांची नावे मात्र फाईलमध्येच अडकलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे, महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक सय्यद समी उर्फ माजू लाला यांचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याची चर्चा आहे. पण पहिल्या क्रमांकावर नाव असले तरी सर्वांच्या मनात स्थान मिळेलच असे नाही, हेच सध्या शिवसेनेतील अंतर्गत विरोधातून स्पष्ट होत आहे.

Uddhav Thackeray_Vijay Vadettivar
Kolhapur: कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची शक्ती कमी पण...; महायुतीकडून 'या' गोष्टी पदरात पडतील अशा मुश्रीफांना अपेक्षा

पक्षातीलच एका गटाने त्यांच्या नावाला विरोध दर्शवल्याने सर्वात मोठा पक्ष, पण एकमत लहान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात सध्या महापौर ठरवायला एवढा वेळ लागतोय, मग शहर चालवायला किती लागणार? असा खोचक सवाल विचारला जात आहे. तर विरोधकांकडून सत्ता मिळाल्यावरही निर्णय न होणे म्हणजे राजकीय कोंडीचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शिवसेना आमचाच महापौर या भूमिकेवर ठाम, तर दुसरीकडे अंतर्गत मतभेद, काँग्रेसचा सावधपणा आणि नावांवरील आक्षेप यामुळे परभणी महापालिकेतील सत्तास्थापना अजूनही 'वेट अँड वॉच' मोडमध्येच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com