Sanjay Raut Albania post : संजय राऊतांच्या अल्बानिया पोस्टवरून सोमय्यांचा पलटवार; संजय निषादांच्या विधानाने चर्चेला नवे वळण

Sanjay Raut Albania court video sparks political row with Kirit Somaiya. Read Sanjay Nishad reaction on voters and democracy : अल्बानियातील न्यायालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ राऊतांनी शेअर केला; सोमय्यांचा जोरदार पलटवार, तर संजय निषाद यांनी लोकशाहीत मतदार हाच खरा न्यायाधीश असल्याचे म्हटले.
Sanjay Raut Albania post
Sanjay Raut Albania postSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut Over Albania Court Video : अल्बेनियातील सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेने बंड पुकारले असून, तिथे सर्वत्र अशांतता पसरली आहे. लोकांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर धावा बोलत जाळपोळ केली. अल्बेनियातील या परिस्थितीवर भाष्य करताना, संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालय जळणारा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओ शेअर करण्यामागे राऊतांच्या टायमिंगची चर्चा आहे. परंतु राऊतांनी व्हिडिओ शेअर करताच, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोशल मीडियातूनच जोरदार पलटवार केला. या दोघांच्या प्रतिवादात, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री संजय निषाद यांनी, संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रियेवर, लोकशाहीमध्ये मतदार हाच खरा न्यायाधीश असतो, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अमेरिका, फ्रान्स, इटली, अल्बानिया आणि पोर्तुगाल या प्रमुख देशांत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांविरोधात लोकांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. तसेच युरोपमधील बेल्जियम, ग्रीस, सर्बिया, आफ्रिकेतील केनिया आणि लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिया, पेरू व इक्वेडोरसारख्या देशांमध्येही लोकांची निदर्शने सुरू आहेत. भ्रष्टाचार, फसलेली आर्थिक धोरण, महागाई, राहणीमानाचा वाढता खर्च, गृहनिर्माण संकट आणि सरकारी (Government) धोरणांमधील त्रुटींवरून ही निदर्शन सुरू आहे.

भारतात एसआयआर, निवडणुकीच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेला होता. त्यावरून बराच वाद झाला. न्यायालयावर टिप्पणी करणाऱ्यांविरोधात नोटीसा बजावण्याच्या आल्या आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

Sanjay Raut Albania post
Ahilyanagar DCC bank election : मोठी राजकीय घडामोड! राम शिंदे, विखे, थोरात, लंके एकत्र; अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार?

यातच अल्बानिया देशात लोकांच्या निदर्शनांनी घेतलेल्या हिंसक रूप पुढे आले आहे. भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत असल्याच्या आरोपावरून लोकांनी थेट सर्वोच्च न्यायालयावर धावा बोलून, जाळपोळ केली आहे. त्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. संजय राऊत यांच्या या टायमिंगमुळे त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Sanjay Raut Albania post
Pankaja Munde Dasara Melava : सुजय विखे भाषणाला उभे राहताच पंकजा मुंडे पुढे आल्या; डोक्यावरील पंचा काढताच जल्लोष! (Video)

राऊत यांनी काय म्हटले

ही पोस्ट करताना, संजय राऊत यांनी अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर, मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे, असे म्हटले.

राऊतांच्या पोस्टला सोमय्यांचे तिखट प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या या पोस्टवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत आणि ठाकरे सेना अल्बेनियातील सर्वोच्च न्यायालय जाळण्याच्या घटनेचे समर्थन करत आहेत. संजय राऊत यांनी भारताच्या राष्ट्रपतींवर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचाही अपमान केला आणि आता अल्बेनियातील सर्वोच्च न्यायालय जाळण्याच्या घटनेचे समर्थन करत आहेत. ते निराश झाले आहेत. सत्तापालट घडवून आणण्यासाठी त्यांना भारतात अराजकता निर्माण करायची आहे. भारताची जनता, अशा अराजकतावादी प्रवृत्तींना कधीही पाठिंबा देणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

संजय निषाद यांची प्रतिक्रिया चर्चेत

संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर सर्वात लक्ष वेधले आहे ते, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री संजय निषाद यांनी. त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “लोकशाहीत मतदार निर्णय घेतात. लोकशाहीमध्ये मतदार हाच खरा न्यायाधीश असतो. कोण चांगले आणि कोण वाईट, हे जनता ठरवते. एखाद्या व्यक्तीने काही सांगितले म्हणून तपासात एखाद्याला दोषी ठरवता येत नाही. तपासातून दोष सिद्ध झाल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला दोषी मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारचे दावे करता येणार नाहीत.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com