
Mumbai News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेल्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच होत चालली आहे. त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट नाव सोडत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणीत भरच पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. त्यामुळे मुंडे यांना दबाव वाढल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
औरंगाबाद खंडपीठात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध याचिका राजाभाऊ फड व करुणा शर्मा यांच्याकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये बोगस मतदान आणि शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली, माहिती दडवून ठेवली, असे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या 2014 सालातील विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान देणाऱ्या या याचिका आहेत. या दोन प्रकरणात प्रत्येकी पाच हजार, असे मिळून दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
त्यानंतर त्यांच्यावर करुणा शर्मा यांनी देखील काही गंभीर आरोप केले, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान आता त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नसल्याने, मुंडे यांच्याकडून 10 हजार रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही लेखी उत्तर दाखल करण्यात आले नसल्याने, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल ( कोस्ट-शास्ती ) करून संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे यांना नोटीसा देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे अखेर आठ ऑगस्टला झालेल्या सुनावणी वेळी, धनंजय मुंडे यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल करून, संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी ,असे आदेश देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भरच पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.