Dharashiv Political News : धाराशिवमध्ये भाजपने पाठीत खंजीर खुपसला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप; वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत

Shiv Sena Shinde faction allegations News : धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बैठकीत निवडणुका महायुती एकत्र लढणार असे ठरले होते.
Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र मोठ्या राजकीय घडामोडी पाहवयास मिळत आहेत. त्यातच धाराशिव नगरपालिकेतील निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा भाजपवर जोरदार निशाणा साधला. एकीकडे महायुती करण्याची चर्चा करीत भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेत गुंतवून ठेवले. त्यानंतर भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बैठकीत निवडणुका महायुती एकत्र लढणार असे ठरले होते. मात्र, शुक्रवारी धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ऐन उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला धोका दिला असल्याचा आरोप सुरज साळुंके यांनी केला आहे. महायुतीच्या जागा वाटपावरून आता वेगळी भूमिका घेऊन निवडणूक लढविण्याची तयारीही साळुंके यांनी दर्शविली आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar NCP : बारामतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने गुलाल उधळला; आठ जागांवर बिनविरोध बाजी!

धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर 17 जागा आणि काही सभापती पदे शिवसेनेला देण्याचे ठरले. परंतु 2016 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे असताना ही पदे भाजपला देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
BJP winning 100 seats survey : भाजपच्या सर्व्हेने एकनाथ शिंदेंची झोप उडाली; स्वबळावर 100 जागा निश्चित...

त्यानंतर युतीधर्म म्हणून शिवसैनिकांची समजूत काढून 17 जागा लढविण्याची तयारी केली. वास्तवात आमच्याकडे देखील नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी 41 उमेदवार असताना आम्ही 17 जागा लढविण्याचे मान्य केले. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्हाला 2 जागा घ्या, 4 जागा घ्या असे सांगून ऐनवेळी 17 जागावर त्यांचे उमेदवार कायम ठेवून धोका दिला आहे. आता वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Congress Politics: मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेसचा मूड बदलला; उद्धव ठाकरेंना नवी 'ऑफर'

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, भाजपने उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अडचण झाली. त्यामुळे आता येत्या काळात धाराशिव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी शिवसेना काय निर्णय घेणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
BJP President : भाजप अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा; बिहार निवडणुकीची डेडलाईन संपली, 'ही' नावे चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com