Dr. Padmsingh Patil : बेधडक अन् निडर; डॉ. पद्मसिंह पाटलांचा थरारक राजकीय प्रवास...

Dharashiv Politics : छगन भुबळांची ढाल बनून शिवसेनेशी घेतला होता पंगा
Dr. Padmsingh Patil
Dr. Padmsingh PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Personality : वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्याची सुरुवात करणारे माजी मंत्री, डॉ. पद्मसिंह पाटील डॉक्टरी पेशात फार काळ रमले नाहीत. ढोकी येथे मराठवाड्यातील पहिल्या तेरणा सहकारी कारखान्याची पायाभरणी झाली होती. त्यांच्या मनाने उचल खाल्ली, सहकारी कार्यकर्त्यांनी बळ दिले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती, आमदार ते कॅबिनेटमंत्री अशी त्यांनी मजल मारली. त्यांचा हा प्रवास धाडसाने भरलेला आहे. गोळीबारातून जिल्हा बँकेच्या संचालकांची सुटका, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळांना संरक्षण देण्यासह दुष्काळी मराठवड्यात उजनीचे पाणी आरक्षित करण्यापर्यंत अनेक कामे त्यांनी निडरपणे पार पडली. राजकारणात मंत्रिपदापर्यंत मजल मारल्यानंतरही पद्मसिंह पाटल डॉक्टरसाहेब याच नावाने परिचित आहेत.

Dr. Padmsingh Patil
Maratha Vs OBC : मराठा विरुद्ध ओबीसी वादाने विरोधकांना सहानुभूतीपासून दूर लोटले...

राजकारणात अत्यंत चाणाक्ष असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटलांची जवळपास ४० वर्षे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व होतं. त्यांच्या राजकीय चातुर्यापेक्षा अधिक चर्चा त्यांच्या धाडसाचीच होते. त्याच्या धाडसांचे अनेक किस्से आजही राजकीय वर्तुळातून सांगितले जातात. त्यातील काही ठळक घटनांची येथे आठवण करून दिली आहे.

गोळीबार आणि जिल्हा बँक

उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा एकत्र असताना जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाचे होते. त्यांनी काही संचालकांना सांगली येथील वसंतदादा पाटील यांच्या कारखान्यावर ठेवले होते. तेथे मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यावेळी मोठं धाडस दाखवत डॉक्टर साहेब त्या कारखान्यावर गेले होते. कारखान्यात घुसून त्यांनी संचालकांना बाहेर काढलं होतं. त्यावेळी तिथं त्यांच्यावर गोळीबार झाला. तशा परिस्थितीतही त्यांनी संचालकांची सुटका करून आणले होते. जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आली.

Dr. Padmsingh Patil
Sujay Vikhe Patil : थोरातांमध्ये दम, दानत अन् माणुसकी नाही; सुजय विखेंनी सगळंच काढलं

छगन भुजबळांची ढाल

मंडल आयोगाला विरोध केल्याने छगन भुजबळांनी यांनी शिवसेनेत बंडखोरी करून १२ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवश केला होता. त्यामुळे शिवसेनेत त्यांच्याविषयी प्रचंड रोष होता. त्यांना धडा शिकवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला होता. स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना सभागृहात आणणे गरजेचे होते.

त्यावेळी नागपूरला अधिवेशन होते. शिवसैनिक संतप्त असल्याने भुजबळ आणि आमदारांच्या सुरक्षेचा पेच निर्माण झाला होता. शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना बोलावून ही जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा केली. कारण त्यावेळी शिवसेनेची प्रचंड दहशत होती. त्यावेळी पद्मसिंह पाटलांनी ही जबाबदारी स्वतःहून आपल्या अंगावर घेतली.

Dr. Padmsingh Patil
Solapur News: 'भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' फेसबूक पोस्टकरून पोलिसाने स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या...

पिस्तुलाला घाबरले नाही

पद्मसिंह पाटलांनी भुजबळ आणि आमदारांना स्वतःच्या बंगल्यावर ठेवले. त्यांना सभागृहात घेऊन जाताना शिवसेनेच्या मुंबईतील एका आमदाराने पिस्तुल दाखवत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पाटलांनी मात्र त्याला ढकलून देत भुजबळ आणि त्यांच्या आमदारासंह रुबाबात सभागृहात एन्ट्री केली होती. ते दृश्य पाहून सभागृह अवाक् झाले होते. अधिवेशन संपेपर्यंत भुजबळ हे पाटलांसह त्यांच्याच बंगल्यावर होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेब पैलवान म्हणाले

या घटनेननंतर भुजबळ घाबरले होते. 'मी दचकून उठायचो, मग डॉक्टरसाहेब मला त्यांच्या बेडवर झोपवत असत,' अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली होती. काही दिवसांनंतर हृदयाचा त्रास झाल्यामुळे पाटलांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका रुग्णाला पाहण्यासाठी म्हणून तेथे आले होते. त्यावेळी त्यांना पाटीलही तेथेच दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती. 'आता तब्येत कशी आहे पैलवान,' अशा शब्दांत बाळासाहेबांनी त्यांची विचारपूस केली होती.

तीन हजार लोकांना दटावले

पद्मसिंह पाटील खासदार असताना परंडा येथील सीना-कोळेगाव प्रल्पातून सोलापूर जिल्ह्यात पाणी सोडण्यात आले होते. पिण्यासाठी म्हणून सोडलेले हे पाणी प्रत्यक्षात मात्र उसासाठी सोडल्याची माहिती त्यांना मिळाली. ते तातडीने सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. समोर दोन-तीन हजार लोकांचा जमाव असतानाही ते तिथे गेले होते. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन पंचनामे केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून ते पाणी थांबवले होते. त्यामुळे त्यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत परंडा तालुक्याची सोय झाली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Dr. Padmsingh Patil
Chhattisgarh CM: कोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री ? आदिवासी की ओबीसी; आज तिढा सुटणार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com