Dharashiv ZP politics : धाराशिवमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार; दोन्ही शिवसेना एकत्र येणार? असा आहे सत्तास्थापनेचा प्लॅन

Dharashiv ZP president election News : धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 28 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, याठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हालचाली सुरु आहेत. सध्या सर्वच सदस्य सहलीवर गेले असल्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 28 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा सदस्य व अपक्ष तीन सदस्यांनी पाठींबा दिला तर सत्तेचे समीकरण सुटू शकते. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

धाराशिव जिल्हयातील निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. भूम-परंडा-वाशी मतदारसंघ वगळता भाजपची (BJP) एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. मात्र, भूम-परंडा-वाशी मतदारसंघात भाजप व तानाजी सावंत यांचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे टाकले होते. त्यामुळे आमदार सावंत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे येथील सत्ता स्थापन करण्याबाबत सस्पेन्स वाढला आहे.

rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

धाराशिव जिल्हा परिषदेत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे. हे समीकरण जुळवताना सावंत यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेतीलच एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
BJP Vs Shivsena UBT : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मुस्लिम महापौर; भाजपने दाखवला आरसा; ही तर 'जनाब सेना' म्हणत डिवचले!

धाराशिव जिल्ह्यात सत्तास्थापन करण्यासाठी आता सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणे चर्चेत आहेत. त्यानुसार पहिले समीकरण पहिले तर हे भाजपच्या बाजूने आहे. त्यानुसार भाजपचे 19, शिवसेना (एकनाथ शिंदे यांच्या गटातील सावंत समर्थक वगळून) 7, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 6, अपक्ष 3 असे एकूण 35 सदस्य होतात. त्यामुळे या समीकरणानुसार भाजपची सत्ता येऊ शकते.

तर दुसऱ्या भाजपविरोधी आघाडीच्या समीकरणानुसार शिवसेना (एकनाथ शिंदे गट)15, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्रित 10, अपक्ष 3 असे एकूण: 28 मॅजिक फिगर गाठू शकतात. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
NCP Leadership : ‘विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादांकडे देण्याचा निर्णय पवारांसह सर्व नेत्यांनी घेतला होता’

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे याठिकाणी महायुतीचे वर्चस्व आहे.

rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

झेडपी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणताच दगाफटका होऊ नये, यासाठी सर्व पक्षांनी निवडून आलेल्या सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. सत्ता स्थापनेपर्यंत सदस्य सुरक्षित ठेवण्यावर सर्वच पक्षांचा भर आहे. महायुतीकडे संख्याबळ असले तरी अध्यक्षपद नेमके कुणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आपली ताकद वापरून सत्ता काबीज करणार की भाजपविरोधी आघाडी शेवटच्या क्षणी चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत वेगवेगळया आघाड्या पहावयास मिळाल्या आहेत. त्यामुळे उत्सुकता एकीकडे शिगेला पोहचली आहे.

rana patil, kailas patil, tanaji sawant, omraje nimbalkar
Shivsena-BSP Alliance : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट, शिवसेनेची-बहुजन समाज पक्षासोबत युती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com