Ratnakar Gutte : आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू सापडला नाशिकच्या मनमाडमध्ये...

Sumit Gutte found in Nashik's Manmad : आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमीत भागवत गुट्टे हा पुण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो नाशिक जिल्ह्यात आढळून आला आहे.
Ratnakar Gutte
Ratnakar Gutte Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 05 January : पुण्यातून बेपत्ता झालेला परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमीत भागवत गुट्टे (वय २४, रा. दैठाना घाट, ता. परळी, जि. बीड) हा नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये सापडला आहे. मनमाडच्या बसस्थानकात तो पोलिसांना सापडला असून मनमाड पोलिसांनी त्याबाबतची माहिती पुण्याच्या सांगवी पाेलिसांना दिली आहे. पुण्यातून पाच दिवसांपूर्वी सुमीत बेपत्ता झाला होता.

आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचा नातू सुमीत गुट्टे याचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो नोकरीच्या शोधासाठी पुण्यात आला होता. घरातून निघताना त्याने आपण पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात मुलाखतीसाठी जात आहे, असे सांगून गावावरून पुण्यात आला होता. गावावरून आल्यानंतर तो आळंदीत दोन दिवस राहिल्याची माहिती आहे.

दोन दिवस आळंदीत राहिल्यानंतर तो ज्युपिटर रुग्णालयात मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगून आला होता. पिंपरीमधील (Pimpri) पिंपळे निलख भागातील रक्षक चौकातून सुमीत हा बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा फोनही बंद येत होता. सुमीत गुट्टे याचे त्याच्या घच्याशी एक जानेवारी रोजी शेवटचं बोलणं झालं होतं.

Ratnakar Gutte
Sudhir Mungantiwar : मंत्रिपद न मिळण्याचे खुद्द सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले कारण...

आमदार गुट्टे यांनी या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पाेलिसांना सापडत नव्हता. अखेर आज (ता.05जानेवारी) नाशिक जिल्ह्यातील मनमाड बस स्थानकाच्या आवारात सुमीत गुट्टे सापडला आहे. मनमाड पोलिसांनी सुमीतला ताब्यात घेतले आहे. मनमाड पोलिस त्याबाबत चौकशी करीत आहेत.

Ratnakar Gutte
Mahavikas Aghadi News : प्रणिती शिंदेंमुळे माझी अडचण झाली; मला मतदारसंघ बदलावा लागला : पवारांच्या आमदाराने व्यक्त केली खंत

दरम्यान, मनमाड पोलिसांनी सुमीत गुट्टे याच्या घरच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली आहे. याशिवाय पुण्यातील सांगवी पोलिसांनाही त्यांनी सुमीत गुट्टे सापडल्याची माहिती दिली आहे. सुमीत गुट्टे याच्या घरचे लोकही त्याला घेण्यासाठी मनमाडकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com