Eknath Shinde funds for MLAs : निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंचा मोठा 'धमाका'; आमदारांना दिलेला भरघोस निधी गेमचेंजर ठरणार का?

Eknath Shinde election News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या निधीवाटपामुळे येत्या काळात शिवसेना, भाजपच्या आमदारांना मोठी मदत होणार असल्याने त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात आमदारांना दिलेला भरघोस निधी हा गेमचेंजर ठरणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे. या निवडणुका डिसेंबर, जानेवारीमध्ये होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षाने एकीकडे तयारी सुरु केली आहे. त्यातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्यावतीने जवळपास 750 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे. दोन विशेष योजनांच्या अंतर्गत 3 लाखांपासून 10 कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या निधीवाटपामुळे येत्या काळात शिवसेना, भाजपच्या आमदारांना मोठी मदत होणार असल्याने त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात आमदारांना दिलेला भरघोस निधी हा गेमचेंजर ठरणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आलेला बहुतांश निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळाला आहे. त्यासोबतच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आमदारांनाही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे समजते. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषगाने दोन्ही पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

Eknath Shinde
BJP campaign Pune: भाजपने पुण्यातच जोर लावला; बड्या नेत्यांना पायघड्या; अजितदादांचा पहिल्यांदाच पलटवार

नगरविकास विभागाच्या या दोन योजनांमुळे नगर विकासाला पायाभूत सुविधा आणि विशेष प्रकल्पांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांना निधी वाटपाचे अधिकार मिळाले आहेत. महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील प्रभागांना निधी वाटपाचे अधिकार नगर विकासकडे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून देण्यात आलेला बहुतांश निधी महायुतीच्या आमदारांना मिळालेला आहे. त्यातही शिंदेसेनेच्या आमदारांना जास्त निधी मिळाला असल्याचे समजते. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये येत्या काळात बरीच कामे होताना दिसणार आहेत. याचा फायदा त्या-त्या भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे.

Eknath Shinde
Eknath Khadse : मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना सांगावं लागतं, हे दुर्दैवं.. एकनाथ खडसेंनी पूरस्थितीवरुन घेरलं

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर, जानेवारीमध्ये होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या विभागाने मोठ्या प्रमाणात निधी वाटप सुरु केले आहे. हा निधी 3 लाखांपासून 10 कोटी रुपयांपर्यंत आहे. या माध्यमातून पदपथ बांधणी, सांडपाणी व्यवस्थापन, सभागृह, ग्रंथालय आणि व्यायामशाळांचं सौंदर्यीकरण अशी कामे मार्गी लावली जाऊ शकतात. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर, प्रश्नांवर होत असल्याने ही कामे मार्गी लागल्यास त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो.

Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Radhakrishna Vikhe : ठाकरेंच्या राजकारणावर मंत्री विखे बरसले; म्हणाले, 'त्यांचं दुर्दैव...'

महायुतीच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने याठिकाणी टार्गेट केले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर महायुतीला वर्चस्व मिळवायचे असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यामुळेच निधीवाटप करीत असताना मुंबईत मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.

Eknath Shinde
Uddhav Thackeray solution: कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार? अजितदादांची अडचण उद्धव ठाकरेंनी झटक्यात दूर केली

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांमुळेच मुंबईतील शिवसेना, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघाना भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये चेंबूर, घाटकोपर पूर्व, कुलाबा, चारकोप, बोरिवली मतदारसंघांचा समावेश आहे. यातील बहुतांश मतदारसंघांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या विकास कामाना येत्या काळात वेग येणार आहे.

Eknath Shinde
Uddhav Thackeray solution: कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार? अजितदादांची अडचण उद्धव ठाकरेंनी झटक्यात दूर केली

मुंबई महापलिकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) ठाणे महापलिका निवडणूक जिंकायची असल्याने ठाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. काही ठिकाणी महापालिका कार्यालय आणि हिंदू स्मशानभूमींच्या डागडुजीसाठी जास्त निधी देण्यात आला आहे. सर्वाधिक 61.5 कोटी निधी ठाणे शहराला देण्यात आला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. तर त्यांच्या सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असल्याने या जिल्हयातील नगर परिषदांनाही मोठा निधी देण्यात आला आहे.

Eknath Shinde
Devendra Fadnavis : सगळे निकष बाजूला ठेवून मदत, देवेंद्र फडणवीसांची घोषणा! पण शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नगरविकास विभागाकडून शिवसेना आमदारांना भाजपच्या आमदारांपेक्षा अधिक निधी मिळत होता. त्याचप्रमाणे आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेनेच्या आमदारासोबतच भाजपच्या आमदाराना निधी दिला होता. या निधीवाटपाचा फायदा आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या आमदारांना दिलेला हा भरघोस निधी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar : आमची भावकी पालकमंत्रिपदाची स्वप्नं बघत होती; पण 'मी तुला पाडणार' असे त्याला सांगितले होते : अजितदादांचा हल्ला

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी भरघोस निधी वितरित करून मोठी 'ताकद' दिली आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या निधीमुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळणार असून, स्थानिक पातळीवर युतीच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी हा 'विकास निधीचा बॉम्ब' टाकला आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar : 'आधी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, पण आता....', कार्यकर्त्यांसमोरच अजितदादांनी काढली शरद पवारांची आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com