Ambadas Danve : मोदींचे बोट धरून तुम्ही 'देवेंद्र' नावाचा कोणता बायपास बांधताय? ठाकरेंच्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला

Ambadas Danve attack on Eknath Shinde : "काल परभणीच्या सभेत 'मोदीजींशी माझी तब्बल अर्धा तास चर्चा झाली' असा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घसा इतका कोरडा पडला की, वाटलं मराठवाड्याचा दुष्काळ आता मंचावरच संपतो की काय," अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.
Eknath Shinde | Narendra Modi
Eknath Shinde | Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani News, 08 Oct : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिंदे अशा भेटी वारंवार घेत असतात. परभणी येथील दुष्काळग्रस्तांना मदत वाटपाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मोदींचे तोंड भरून कौतुक केले. दुष्काळासंदर्भात आपली त्यांच्याशी अर्धा तास चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यात एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बायपास करून थेट मोदी शहा यांच्या भेटी घेत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

मोदींचे बोट धरून तुम्ही 'देवेंद्र' नावाचा कोणता बायपास बांधत आहात? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. याशिवाय मोदी यांच्याशी दुष्काळावर चर्चा केली म्हणता मग केंद्राचे पथक आणि थेट मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? असा खोचक सवाल दानवे यांनी उपस्थित केला. याशिवाय एकनाथ शिंदे यांना काही प्रश्नही केले आहेत.

काल परभणीच्या सभेत 'मोदीजींशी माझी तब्बल अर्धा तास चर्चा झाली' असा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घसा इतका कोरडा पडला की, वाटलं मराठवाड्याचा दुष्काळ आता मंचावरच संपतो की काय, अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली. दिल्लीश्वरांशी एवढी 'ऐतिहासिक' चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे नशीब एका रात्रीत उजळायला हवे होते. कॅमेऱ्यासमोर घसा कोरडा करून जनतेला 'आभासी दिलासा' देणाऱ्या महोदयांनी जरा पाणी पिऊन या साध्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तसदी घ्यावी.

Eknath Shinde | Narendra Modi
DCC Bank Elections : जिल्हा बँक निवडणुकीबाबत मोठी घडामोड! 10 वर्षांच्या नियमाने धसका घेतलेल्या संचालकांना दिलासा

१. पंतप्रधान मोदी अर्धा तास दुष्काळावर चर्चा करत होते, मग त्यांनी हे सांगितले का की केंद्राची पथके मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी कधी येतील?

२. केंद्राची मदत महाराष्ट्राला कधीपर्यंत प्राप्त होईल?

३. तुमच्याकडून माहिती घेतली, मग ही माहिती आधी अधिकृतरीत्या मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधानांना कळवली नव्हती का?

४. तुम्ही देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे बोट धरून 'देवेंद्र' नावाचा कोणता नवा 'बायपास' बांधत आहात का?

५. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या शब्दांचा अर्थ 'प्रतिगुंठा रु. ८५' एवढी आर्थिक मदत असा घ्यायचा का?

Eknath Shinde | Narendra Modi
Gyanesh Kumar SIR Protest : ज्ञानेश कुमार पदावर राहिल्यास लोकशाहीचा घात? 'SIR' विरोधी आक्रमक आंदोलनाचा भडका; आता धुळे-जळगावतही ठिणगी!

६. ८५ टक्के पिके खराब झाली हे जाहीरपणे मान्य करता, मग मदतीची घोषणा कधी होणार?

७. गेल्या वर्षी अतिवृष्टीची जाहीर झालेली मदत सरकार शेतकऱ्यांना कधी देणार? प्रत्यक्ष किती मदत मिळाली, हे जाहीरपणे सांगणार का?

८. बँकांचा तगादा कमी करणार म्हणता, मग तो कधी थांबवणार? बोला एकनाथ संभाजी शिंदेजी बोला, असा चिमटा ही या प्रश्नांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांनी काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com