Shiv Sena internal dispute : मंत्रिपद नाकारलेल्या तानाजी सावंतांची एकनाथ शिंदेंच्या सभेकडे पाठ : दीड वर्ष झाले तरी नाराजी दूर होईना...

Shiv Sena Leaders News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला तीन दिवसाचा अवधी असल्याने आता मोठ्या नेत्याच्या सभा होत आहेत.
Eknath Shinde, Tanaji Sawant
Eknath Shinde, Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला तीन दिवसाचा अवधी असल्याने आता मोठ्या नेत्याच्या सभा होत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सीएम फडणवीस यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत.

विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. या सभेला धाराशिव जिल्ह्यातील माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दांडी मारल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत पक्षाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या चार दिवसापासून तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या भूम-परंडा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करीत असताना त्यांनी जिल्ह्यात इतरत्र जाण्याचे टाळले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीपासून फक्त त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. धाराशिव जिल्ह्यात असूनही सावंत यांनी शिंदेंच्या सभेला दांडी मारली आहे. त्यामुळे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Eknath Shinde, Tanaji Sawant
Ajit Pawar Asthi Visarjan: राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या लाडक्या नेत्याला वाहणार अनोखी श्रध्दांजली; कशी असणार देशव्यापी कलश यात्रा?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेवळी येथे प्रचार सभेच्या निमित्ताने आले होते. यावेळी धाराशिव जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित होते. त्याचवेळी दुसरीकडे माजी पालकमंत्री तानाजी सावंत मात्र गैरहजर होते. त्यामुळे शिवसैनिकात दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.

Eknath Shinde, Tanaji Sawant
Ajit Pawar Last Phone : अजित पवारांचा फोनवरील शेवटचा संवाद समोर, आम्ही सर्व जाती धर्मांना..., श्रीजीत पवारांसोबत काय बोलले?

भूम, परंडा, वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुक प्रचारात तानाजी सावंत सक्रिय दिसत आहेत. जिल्हयातील नगरपरिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांची मतदारसंघात मित्र पक्षांसोबत युती नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. तानाजी सावंत यांच्या मनात नेमके काय ? सुरु आहे अशा चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde, Tanaji Sawant
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देणार? मिटकरींच्या मागणीवर CM फडणवीस यांचे 'पॉझिटिव्ह' उत्तर

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेतील तानाजी सावंत यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो’ अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला दम दिला. तानाजी सावंत यांनी थेट विरोधी उमेदवारावर टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त केला, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला.

Eknath Shinde, Tanaji Sawant
BJP Defeated : भाजपचा सपाटून पराभव, महापौरपदी अजीव पाटील; उपमहापौरपदी लोपीस; ठाकूरांचे सोशल इंजिनिअरिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com