Eknath Shinde Speech News : तुम्ही अडीच वर्ष 'शिव्याशाप' दिले, पण लोकांच्या तोंडातून आमच्यासाठी 'ओव्या'च बाहेर पडल्या!

Maharashtra Chief Minister Eknath Shinde claims that the good decisions taken by him during his tenure will be remembered in history. : विधानसभा निवडणुकीत उबाठाने 97 जागा लढवल्या आणि वीस निवडून आले. आम्ही 80 लढवल्या आणि 60 निवडून आले, मग खरी शिवसेना कोणाची? लोकसभेत आपल्याला दोन लाख आणि विधानसभेत 15 लाख मतं जास्त मिळाली.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी म्हणायचे, पण त्यांच्यानंतर शिवसैनिकाला घरगडी, नोकर समजले जायचे. शिवसेना, धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार या लोकांनी काँग्रेसकडे गहाण ठेवले. तेव्हा पक्षातील आमदारांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याची भावना होती. म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि शिवसेना, भगवा, बाळासाहेबांचे विचार वाचवले.

अडीच वर्षापुर्वी आम्ही हा निर्णय घेतला तेव्हापासून ते आम्हाला शिव्याशाप देत आहेत. पण अडीच वर्षात इतिहासात नोंद घेतली जाईल एवढे निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेने जनतेसाठी घेतले. त्यामुळे लोकांच्या तोंडातून आमच्यासाठी ओव्याच बाहेर पडतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावले. नांदडे जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के रिझल्ट आणि स्ट्राईक रेट दिल्याबद्दल एकनाथ शिंदे नांदेडकरांचे आभार मानण्यासाठी आले होते.

यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीका केली. शंभर टक्के रिझल्ट,स्ट्राईक रेट हे नांदेडकरांचे यश आहे. लाडक्या बहि‍णींचा आवाज विधानसभा निवडणुकीत घुमला. (Shivsena) मी तुम्हाला प्रचाराच्यावेळी सावत्र भावाला जोडा दाखवा असे म्हणालो होतो, तो तुम्ही दाखवलात. 'एक ही मार पण साॅलीड मारा' अशा शब्दात त्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले. अशीच माया आभाळागत राहू यापुढेही राहू द्या. डोळे दिपवून टाकणारे यश तुम्ही दिले.

Eknath Shinde News
Latur Shivsena Leader Crime : न्यायालयाने उपजिल्हाप्रमुखाच्या कानशिलात लगावली, आवाज पक्षप्रमुखांपर्यंत जाईल का?

आतापर्यंतच्या इतिहसात एवढ्या जागा कधी आल्या नव्हत्या. तुमच्यासाठी सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही देतांनाच आमदार हेमंत पाटील यांचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राचे कामही सुरूच राहील, हा माझा शब्द आहे, असे शिंदे यांनी सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे कटाक्ष टाकत बालाजीचं कल्याण होणार हे मला माहित होतं, त्याला साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी दिल्याचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला.

Eknath Shinde News
Eknath Shinde politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत नीलमताई गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या...

बाबुरावची दिल्ली वारी चुकली, पण..

बाबुराव कदम यांची लोकसभेला फेक नरेटीव्हमुळे दिल्लीची वारी चुकली, पण मुंबईत त्यांनी जोरदार धडक मारली. आनंद बोंढारकर सर्वेत मागे पडायचा, पण हेमंत पाटील यांनी सांगितले ते निवडून येणारच आणि ते खरे ठरले. हेमंत पाटील यांना मी झापायचो, निवडून आला नाही तर मला तोंड दाखवू नको, असे मी त्याला सांगितले होते. लोक काम करणाऱ्याला निवडून देतातच, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मोठं कधी व्हायचं, म्हणून बोंढारकरला संधी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde News
MLA Balaji Kalyankar Allegation News : माझ्या विरोधात भाजपने पैसे वाटले; महायुतीत खडखडाट सुरूच!

नांदेडच्या विकासाचा चौकार आपले निवडून आलेले आमदार मारतील. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे. आपल्या पक्षात वशिला चालत नाही, कामाचे मेरिट चालते. म्हणूनच शिवसेनेत घुसमट होत होती तेव्हा पन्नास जणांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही निर्णय घेतला. त्या सरकारमध्ये अनेक मंत्री होते, पण आम्ही सत्तेला लाथ मारून बाहेर पडलो, असेही शिंदे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत उबाठाने 97 जागा लढवल्या आणि वीस निवडून आले. आम्ही 80 लढवल्या आणि 60 निवडून आले, मग खरी शिवसेना कोणाची?

Eknath Shinde News
MLA Hemant Patil On Ashok Chavan : काँग्रेस प्रमाणेच भाजपातही अशोक चव्हाण स्वतःचा गट निर्माण करत आहेत! हेमंत पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

लोकसभेत आपल्याला दोन लाख आणि विधानसभेत 15 लाख मतं जास्त मिळाली. दररोज पक्षात प्रवेश सुरु आहेत, कारण आपण शिवसेनाप्रमुखांचे विचार घेऊन पुढे जातोय. मी राज्याचा सीएम होतो, पण मी स्वतःला काॅमन मॅन समजायचो. आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू काॅमन मॅन, आहे, असे शिंदे यांनी सांगितले. इतिहासात नोंद होईल इतके निर्णय या अडीच वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून घेतले.

Eknath Shinde News
MLA Hemant Patil On Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे! 'स्वबळा'ने महायुतीत टेन्शन!

कार्यकर्त्याला जपा, शिवसेना या चार अक्षरासाठी तो मेहनत करतो. त्यांच्या संकटात पाठीशी उभे राहा, त्याला मोठं करण्यासाठी आता तुम्हाला काम करायचं आहे,असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. अडीच वर्ष शिव्या शाप दिले, आम्ही तुम्हाला कामातून उत्तर दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा झेंडा डौलाने फडकवा. तुम्हाला खाली बघण्यासारखं काम सरकारने केलेले नाही, विरोधक सुद्धा हतबल झाले आहेत, असेही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com