

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. दोन दिवसापूर्वीच पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रविवारी कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. सीजेपीच्या राष्ट्रीय संगठन प्रमुखांकडून याबाबत परवानगीसाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाचे स्थळ अन् तारीखही समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. हे आंदोलन 2 ऑक्टोबरला मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे करण्याबाबत मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या गलथान कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर तत्कालीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी महिनाभर आंदोलन करण्यात आले होते. त्यापद्धतीने आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबईत कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) आंदोलन करण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरला मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथेआंदोलन करण्याबाबत मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. आंदोलन संविधानाला अनुरूप आणि शांतिपूर्ण होणार आहे, असा उल्लेख शिवाजी पार्क पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात केला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय संगठन प्रमुख अजिंक्य शिंदे यांच्या वतीने हे पत्र देण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. तर मुंबईतच 4 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला शरद पवार यांच्या पक्षाने पाठींबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.