Fadnavis visits drought affected farmers : CM फडणवीसांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान गोंधळ; शेतकऱ्यांना दोरखंडाने अडवल्याने ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक; सरनाईकांनी काढली समजूत

Maharashtra drought situation News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
dharashiv visit
dharashiv visit Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मराठवाड्यातील दुष्काळी भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. यावेळी लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, धाराशिव जिल्हयातील पाहणी सीएम फडणवीस यांनी केली. या दौऱ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. शेतकऱ्यांना दोरखंडाने अडवून ठेवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

धाराशिव जिल्ह्यातील पिकांची पाहणी करीत असताना सीएम फडणवीस यांनी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. याच मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यासोबतच उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

यावेळी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकरी व ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच सरनाईक यांनी राजकारण करू नका, असे म्हणत ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात फटकारले. त्यामुळे आक्रमक झालेले शेतकरी शांत झाले.

dharashiv visit
Maharashtra Political Live Update : पुणे पोलिसांनी 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली,धंगेकर संतापले

मुख्यमंत्री फडणवीस हे बांधावर आले असता त्यांच्याशी शेतकऱ्यांना संपर्क साधता येऊ नये यासाठी दोरखंडाने अडवले होते. त्यामुळे या भित्र्या सरकारचा निषेध करतो, आम्ही कुठलेही राजकारण करीत नाहीत मात्र शेतकऱ्यांना दोरखंडाने का अडविण्यात आले याचे उत्तर राज्य सरकारने देण्यास हवे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना केली.

dharashiv visit
Maharashtra Political Live Update: सीबीआयची रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई; केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com