Gram Panchayat news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पन्नासपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचे प्रशासक बदलले!

Gram Panchayat administrator latest update News : पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या विस्तार अधिकारी, शाखा अभियंते, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडेही ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला.
Gram Panchayat election
Gram Panchayat election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada news : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकांवर राजकीय हस्तक्षेपाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील 605 ग्रामपंचायतींवर नियुक्त केलेल्या प्रशासकांपैकी तब्बल 51 प्रशासक आतापर्यंत बदलले आहेत.

काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या विरोधी गटातील अथवा नेत्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा आक्षेप घेतल्याने या बदल्या कराव्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींवर १० सप्टेंबरला प्रशासक नियुक्त करण्यात आले.

पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या विस्तार अधिकारी, शाखा अभियंते, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडेही ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला. त्यांना ग्रामपंचायतीच्या खर्चासह प्रशासकीय कामकाजाचे अधिकारही दिले आहेत. मात्र, प्रशासकांच्या नियुक्त्या होताच त्यावर राजकीय हरकतींचा सिलसिला सुरू झाला.

Gram Panchayat election
Shiv Sena Case: धनुष्यबाण ठाकरे की शिंदेंचा, अंतिम फैसला कधी? सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट

संबंधित अधिकारी एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा गटाच्या जवळचा असल्याचा दावा करत काही नेत्यांकडून नवीन प्रशासकांच्या नियुक्तीसाठी शिफारशी करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडे आलेल्या तक्रारी आणि आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५१ ग्रामपंचायतींचे प्रशासक बदलले आहेत.

Gram Panchayat election
Shiv Sena Case: धनुष्यबाण ठाकरे की शिंदेंचा, अंतिम फैसला कधी? सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट

वैजापुरात सर्वाधिक ‘राजकीय’ धुसफूस

भाजपचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे आणि वैजापूरचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्त्यांवरही उमटल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक हरकती वैजापूर तालुक्यातून आल्या असून, आतापर्यंत १८ प्रशासक बदलल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

प्रशासनापुढे पेच, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अजूनही प्रशासक बदलण्यासाठी राजकीय शिफारशी आणि पत्र येतच आहेत. मात्र, सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आधी नियुक्त केलेले प्रशासक बदलता येतील का? याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्रशासक बदलण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी मागणी करणारे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

Gram Panchayat election
Shiv Sena Symbol Case : न्यायाधीशांच्या 'त्या' वक्तव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली; ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला; म्हणाले,'योग्य ठिकाणी धनुष्यबाण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com