Gram Panchyat Election Results : येळी ग्रामपंचायतीवर काँग्रेस-शिवसेना आघाडी,तर अजित पवार गटाला चार जागा

Umarga Political News : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील मुद्दे महत्वाचे असतात.
Gram Panchyat Election Results
Gram Panchyat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

अविनाश काळे -

Umarga News : येळी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी शिवसेनेचे निवृत्ती पवार विजयी झाले. तर "ग्यानबा" ची मेक प्रस्थापितांना जिव्हारी लागली. त्यामुळे चार जणांना पराभव स्वीकारावा लागला.

येळी येथील सरपंचपदासाठी पाच जण निवडणूक(Election) रिंगणात होते. नऊ सदस्यांच्या जागेसाठी १८ जणात दुरंगी लढत झाली. शिवसेना-कॉंग्रेस प्रणित रामलिंगेश्वर ग्रामविकास पॅनेल प्रमुख शिवलिंग स्वामी, व्यंकट मोरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे निवृत्ती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रणित युवा संघर्ष पॅनलचे ग्यानबा उर्फ बाबा पवार यांचा १९४ मतांनी विजयी झाले. निवृत्ती पवार यांना ५२४, ग्यानबा पवार यांना ३३० मते मिळाली. अपक्ष अभिजीत जाधव (१०७), संतोष जाधव (१९१), बालाजी पवार (१३१) तर नोटाला चार मते मिळाली. (Shivsena)

Gram Panchyat Election Results
Gram Panchyat Election Results : नेवाशात ठाकरेंच्या शिलेदाराची बॅट तळपली, गडाखांचा सोळापैकी बारा ग्रामपंचायतींवर डंका

प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेलेले मतदान पुढीलप्रमाणे :  प्रभाग एक प्रशांत देडे २२९ विजयी, अजय कांबळे १८८. सोमेश्वर हिंडोळे २१५ विजयी, प्रशांत बनसोडे २०६. शकुंतला मोरे २३० विजयी, सुवर्णा मोरे १८१. प्रभाग २ रामलिंग बिराजदार २८६ विजयी, विजय रेड्डी १३७. सुजाता पराणे २७१ विजयी, महानंदा माळी २७१ विजयी व सोनाली पराणे १६०, लक्ष्मी माळी १४४. प्रभाग तीन अक्षय बिराजदार २१३ विजयी, किरण पवार २०९. नेत्रावती कांबळे २३३ विजयी, निशा देडे १८६. राजाबाई रेड्डी  २७० विजयी, ममता सजगुरे १४३. दरम्यान नूतन सरपंच निवृत्ती पवार यांनी ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"ग्यानबा" ची मेक !

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील मुद्दे महत्वाचे असतात. सरपंचपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ग्यानबा उर्फ बाबा पवार पराभूत झाले असले तरी, ते प्रस्थापितांच्या पॅनेलमधील महत्वाच्या चार व्यक्तींच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याने विरोधक काही क्षण हताश झाले होते. निकालानंतर फारसा जल्लोष दिसून आला नाही. या निवडणुकीत "ग्यानबा" ची मेक प्रस्थापितांना चांगलीच जेरीला आणल्याची चर्चा या निमित्ताने कार्यकर्ते करीत होते.

पोटनिवडणुकीत भाग्यश्री कुंभार बिनविरोध

तीन ग्रामपंचायतच्या चार रिक्त जागी निवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीत हंद्राळ ग्रामपंचायत दोन जागेपैकी एका जागेवर भाग्यश्री कुंभार यांची बिनविरोध निवड झाली एक जागा रिक्त आहे. कोरेगाववाडी, कोळसूर (गुंजोटी)ची प्रत्येकी एक जागा पुन्हा रिक्त राहिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Gram Panchyat Election Results
Gram Panchyat Election Results : जामखेडच्या जवळा, मतेवाडीत स्थानिक आघाड्यांची बाजी ; तर मुंजेवाडीत भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com