High Court News : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा चंद्राबाबू नायडूंना दणका; 'ती' याचिका केली रद्द...

Chandrababu Naidu चंद्राबाबू आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे 66 आमदार आणि खासदार पोलिसांचा विरोध झुगारून नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील धर्माबादमध्ये घुसले होते.
Chandrababu Naidu, Aurangabad High Court
Chandrababu Naidu, Aurangabad High CourtSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : तत्कालीन आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची धर्माबादमध्ये दाखल असलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. तत्कालीन आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील बाभळी येथील धरणाला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोध केला होता.

चंद्राबाबू आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे 66 आमदार आणि खासदार पोलिसांचा विरोध झुगारून नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील धर्माबादमध्ये घुसले होते.तेव्हा शासकीय कामात अडथळा आणि अन्य कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धर्माबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले होते. त्या ठिकाणी जेलरची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने 20 जुलै 2010 रोजी औरंगाबाद येथील कारागृहात सर्वांची रवानगी करण्यात येणार होती.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Chandrababu Naidu, Aurangabad High Court
Nanded Loksabha News : धक्कादायक! नांदेडमध्ये युवकाने ईव्हीएम मशीन फोडले

या 66 जणांना नेण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली होती. पण, औरंगाबाद कारागृहात जाण्यास नकार देऊन चंद्राबाबू आणि त्यांच्या साथीदारांनी जेलरसोबत हुज्जत घातली. बाहेरील पोलिस आत गेल्यावर पोलिसांना धक्काबुक्की करत काही पोलिसांना मारहाणही करण्यात आली होती.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवून सर्वांना औरंगाबादच्या कारागृहात पाठवण्यात आले होते. या प्रकरणी जेलरच्या तक्रारीवरून चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असल्याचा आदेश देत न्यायालयाने याचिका रद्द केली.

Edited By : Umesh Bambare

Chandrababu Naidu, Aurangabad High Court
Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना दिलासा; स्किल डेव्हलपमेंट घोटाळा प्रकरणात नियमित जामीन मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com