High Court News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या आणखी एका पराभूत उमेदवाराची याचिका कोर्टानं फेटाळली, शिरसाटांना दिलासा

Shivsena Politics : धुळे विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अनिल गोटे यांची निवडणूक याचिका फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एका उमेदवाराची याचिका फेटाळली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aurangabad West Assembly Constituency News : धुळे विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अनिल गोटे यांची निवडणूक याचिका फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एका उमेदवाराची याचिका फेटाळली आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शिंदे यांची विजयी उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली आहे.

निवडणूक याचिकेतील अनिवार्य कायदेशीर त्रुटींची विहित मुदतीत पूर्तता न केल्याने आणि सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने, राजू रामराव शिंदे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने या प्रकरणाचा पाठपुरावा न केल्याने ‘डिफॉल्ट’ मानून न्यायालयाने हा आदेश पारित केला.

नेमके प्रकरण काय?

राजू रामराव शिंदे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेत भारत निवडणूक आयोग आणि इतर प्रतिवादींचा समावेश होता. या मूळ याचिकेविरुद्ध प्रतिवादी संजय पांडुरंग शिरसाट यांनी अर्ज दाखल करून, याचिकाकर्त्याने कार्यालयीन त्रुटी दूर केल्या नसल्याने ही याचिका फेटाळण्याची विनंती केली होती.

याचिका दाखल केल्यानंतर संबंधित वकिलांची नियुक्ती न्यायाधीशपदावर झाल्याने, न्यायालयाने 4 सप्टेंबर 2025 रोजी मूळ याचिकाकर्ते राजू शिंदे यांना नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस मिळूनही याचिकाकर्त्याने नवीन वकिलाची नियुक्ती केली नाही. न्यायालयाने 13 फेब्रुवारी 2026 रोजी 'शेवटची संधी' देऊनही कोणीही हजर न राहिल्याने, अखेर 17 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने या अर्जावर निकाल दिला.

न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा आणि दिवाणी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींचा आधार घेत ही याचिका फेटाळली. याचिका फेटाळल्या गेल्याने संजय शिरसाट यांनी दाखल केलेला दुसरा अर्ज आपोआप निकाली निघाला. या प्रकरणात शिरसाट यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राजेंद्र देशमुख यांनी ॲड. मुकुल कुलकर्णी यांच्यासाठी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. कुणाल काळे, ॲड. अमोल जोशी आणि अ‍ॅड. श्रीराम देशमुख यांनी साह्य केले.

Uddhav Thackeray
Ashok Kharat Scam: खरातचं नवं धक्कादायक प्रकरण समोर; चाकणकरांच्या बहीण-पुतण्यासह अधिकाऱ्यांंच्या नावे बोगस बँक खाती, कोट्यवधींचा घोटाळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com