Hingoli Loksabha Constituency : हिंगोलीची जागा कोणाची ? खासदार हेमंत पाटलांनी एक झटक्यात संपवला विषय

MP Hemant Patil : शिवसेना संपर्कप्रमुखांच्या बैठकीत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करत विजय मिळविण्याचा विश्वासही व्यक्त केला.
Mp Hemant Patil News
Mp Hemant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

संदीप नागरे

Marathwada Shivsena : हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, इथून शिवसेनाच लढणार. अर्थात मी खासदार असल्यामुळे उमेदवारही मीच असेन, असा दावा करत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीची जागा कोणाची, हा विषयच संपवला. (Hingoli Loksabha Constituency ) आगामी लोकसभा निवडणूक राज्यात महायुती एकत्रितपणे लढणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांनी हे वारंवार जाहीरपणे स्पष्ट केले आहे.

Mp Hemant Patil News
Hingoli Loksabha Constituency : हिंगोली मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांना भिडणार...

परंतु लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढली तरी त्यांच्या उमेदवारांचे चिन्ह कमळच असणार, अशीही चर्चा सुरू आहे. (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचे खंडण केले असले तरी ही चर्चा काही थांबायला तयार नाही. या शिवाय शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या अनेक मतदारसंघातही भाजपने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील (Hingoli) हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देणार असल्याचे बोलले जाते. या सगळ्या चर्चांवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आज पूर्णविराम लावला. (MP Hemant Patil) हिंगोलीची जागा युतीच्या काळापासून शिवसेनेकडे आहे. संतोष बांगर हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदारही आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार यात शंका असण्याचे काही कारण नाही. त्यादृष्टीने आम्ही तयारीही सुरू केली आहे. उमेदवार अर्थात मीच असणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुखांच्या शहरात झालेल्या बैठकीत हेमंत पाटील यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर करून टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय पातळीवर लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेगवान हालचालीमुळे देशातील आणि राज्यातील राजकीय पक्ष, संभाव्य उमदेवार आपला मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. नवनियुक्त शिवसेना संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करत विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला.

Mp Hemant Patil News
Hemant Patil: खासदार हेमंत पाटलांना लंडनहून धमकी; पन्नू म्हणाला,'भारतात मोठा स्फोट करणार...'

हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी जोरात सुरू झाली आहे. मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी बूथ प्रमुख, शिवदूत नियुक्त केले असून आपण मागील पाच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे हिंगोली लोकसभेचा उमेदवार आणि खासदारही मीच असेल, असा दावा पाटील यांनी केला. पाटील यांच्या दाव्याने भाजपसह शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Mp Hemant Patil News
Shivsena Political News : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला 'धक्का'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com