Hemant Patil : ‘मला राज्यसभा किंवा विधान परिषदेचा शब्द दिलाय; मुख्यमंत्री तो नक्की पाळतील’

Shivsena Leader News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी मला 35 वर्षे लागली आहेत, त्यामुळे माझं राजकीय पुनर्वसन होणं अजून बाकी आहे.
Eknath Shinde-Hemant Patil
Eknath Shinde-Hemant PatilSarkarnama
Published on
Updated on

Hingoli, 11 october : लोकसभा निवडणुकीत माझे तिकिट कापल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मला काही शब्द दिले होते. मला राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, माझं राजकीय पुनर्वसन होणं अजून बाकी आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझं राजकीय पुनर्वसन करतील, असा विश्वास माजी खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांचे तिकिट भाजपकडून सर्व्हेचे कारण सांगून शिवसेनेला कापायला भाग पाडले होते. त्या वेळी त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला होता. मात्र, तो अजून पूर्ण झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी मला काही शब्द दिले आहेत. ते दिलेला शब्द पाळतील, असा मला विश्वास आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी मला ३५ वर्षे लागली आहेत, त्यामुळे माझं राजकीय पुनर्वसन होणं अजून बाकी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत माझं पुनर्वसन मुख्यमंत्री नक्की करतील, असेही हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी स्पष्ट केले.

हेमंत पाटील म्हणाले, मला त्या वेळी राज्यसभा (Rajya Sabha) किंवा विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. आगामी काळात हा शब्द पाळून मुख्यमंत्री मला कुठेतरी नक्कीच घेतील.

Eknath Shinde-Hemant Patil
Abhijeet Patil : अभिजीत पाटील पोचले थेट ‘सिल्व्हर ओक’वर; अवघ्या तीन दिवसांत पवारांना दुसऱ्यांदा भेटले

हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील दोन ते तीन विधानसभा मतदारसंघाठी मला आग्रह होत आहे. पण स्थानिक काम करणारे कार्यकर्ते किंवा ग्राउंडवर काम करणाऱ्या शिवसैनिकांना संधी दिली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

वसमत मतदारसंघ शिवसेना लढवणार

वसमत विधानसभा मतदारसंघातून माझ्या नावाची चर्चा काही मित्रपक्षांकडून केली जात आहे. मी कधीच वसमत मतदासंघात चाचपणी केलेली नाही. त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते काम करीत आहेत. विशेष म्हणजे 1990 पासून ही शिवसेनेची जागा आहे, त्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघ शिवसेना नक्कीच लढवेल, असा विश्वासही हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde-Hemant Patil
Rajan Patil-Umesh Patil : राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव हेच आमचे टार्गेट; उमेश पाटलांनी रणशिंग फुंकले

हळद संशोधन केंद्राच्या कामाची आठ दिवसांत निविदा

हळद संशोधन केंद्राच्या 800 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगोलीला चांगले दिवस येतील. हळद संशोधन केंद्राच्या जागेसंदर्भात अडचण होती. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो प्रश्न मिटला आहे. संशोधन केंद्राची काही कार्यालये झाली आहेत. येत्या आठ दिवसांत हळद संशोधन केंद्राची इमारत आणि प्रयोगशाळेच्या बांधकामासंदर्भात निविदा निघतील, असेही पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com