Solapur, 08 October : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडत आहेत. त्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरमध्ये न येण्याचे कारण सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे ते सोलापूरच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र, सोलापूरच्या या बहिणींनी दिलेले प्रेम घेऊन थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. ते पुन्हा सोलापूरमध्ये येतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यापूर्वी सोलापूरचा (Solapur) चार वेळा दौरा रद्द झाला होता. तो आज पाचव्यांदा रद्द झाला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार की नाही, अशी चर्चा रंगली होती.
याशिवाय आज त्यांच्या आजारपणाचे कारण देण्यात आले होते. पण, शिंदे यांनी सोलापूरचा दौरा का रद्द केला, हे स्पष्ट केले नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री सोलापूरला का येत नाहीत, असे अशी चर्चा रंगली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव महत्वपूर्ण ठरणारी मंत्रिमंडळाची बैठकी रद्द करण्यात आली आहे.
एकंदरीतच मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौरा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, देवेंद फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री सोलापूरला का येऊ शकले नाहीत, हे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.