Gopichand Padalkar : पवारांच्या नादाला लागून ठाकरेंनी नुकसान करुन घेतलं..

Shivsena : एक आमदार पक्ष सोडून गेला तर त्याच्यासोबत हजारो कार्यकर्ते जात असतात.
Mla Gopichand Padalkar-Uddhav Thackeray News, Aurangabad
Mla Gopichand Padalkar-Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Aurangabad : उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या नादाला लागून आपलं खूप मोठं नुकसान करुन घेतल आहे. पुढील २५ वर्ष ते यातून बाहेर पडू शकतील असे मला वाटत नाही, अशा शब्दात (Bjp) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त पडळकर आले होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांवर टीका करतांनाच उद्धव ठाकरे यांना देखील इशारा दिला.

Mla Gopichand Padalkar-Uddhav Thackeray News, Aurangabad
Nanded News: नांदेड पुन्हा हादरले, काॅंग्रेस महिला कार्यकर्त्यावर गोळीबार...

पडळकर म्हणाले, शरद पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आपली (Shivsena) शिवसेना महाविकास आघाडीसोबत नेली. यामुळे ठाकरेंचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक आमदार पक्ष सोडून गेला तर त्याच्यासोबत हजारो कार्यकर्ते जात असतात. अशा ठिकाणी पुन्हा नवा आमदार निवडून आणणे सोपे नसते. पवारांसोबत जाणे ठाकरेंना चांगलेच महागात पडले आहे, पुढील २५ वर्ष हा पक्ष पुन्हा उभारी घेवू शकणार नाही.

माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन उत्तर देईन. जिथे इंदिरा गांधीचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती है, अशी टीका देखील पडळकर यांनी अजित पवारांवर केली. ओबीसी जनगणना विषयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचा चेहरा उघड करण्याचे काम आणि माझे कर्तव्य आहे, ते मी करत आहे. धनगर, ओबीसी समाजाला न्याय मिळू नये हीच राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची भूमिका राहिलेली आहे. भुजबळ म्हणतात बिहार प्रमाणे ओबीसी जनगणना करा, पण बिहारने निर्णय घेतला तेव्हा तुम्ही मंत्री होता.

आता सरकार बदलताच मागणी करणे, ही दुटप्पी भूमिका आहे. तेव्हा माझी औकात काढण्याऱ्यांनी आधी यावर उत्तर द्यावे. जनगणना करायला माझा विरोध नाही. मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com