Babanrao Lonikar : जालना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केल्यावर लोणीकरांना मुलाला आमदार करायच अन् स्वत:ला खासदार व्हायचंय!

Jalna DCC Bank Politics : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठरल्या प्रमाणे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात नेत्यांची राजकीय फटकेबाजी पहायला मिळाली.
Jalna DCC Bank Politics; babanrao lonikar, Raosaheb Danve and Arjun Khotkar
Jalna DCC Bank Politics; babanrao lonikar, Raosaheb Danve and Arjun Khotkarsarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक असलेल्या मुलाला अध्यक्ष करण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मोठा राडा घातला होता. माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर खालच्या भाषेत आणि वैयक्तिक टीका, समर्थकांकडून त्यांच्या गाडीची तोडफोड आणि नंतर एकमेकांच्या कार्यालयावर चालून जाण्याचा प्रयत्न यामुळे ही निवडणूक गाजली होती.

या राड्यामुळे त्यांना पुढील अडीच वर्षांसाठी "तुमच्या मुलाला अध्यक्ष करू," हा शब्द मिळाला. ठरल्याप्रमाणे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. काल नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडले गेले. राजेश टोपे यांनी दिलेला शब्द पाळला आणि लोणीकर पुत्र राहुल हे बँकेचे अध्यक्ष झाले.

यापुढे "मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, मी राहुलसाठी ही जागा सोडणार आहे," असे सांगणाऱ्या लोणीकर यांना आता खासदार व्हायचे आहे. 2024 मध्येच त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. परंतु महायुतीत ही जागा रासपाच्या महादेव जानकर यांना सोडण्याचा निर्णय झाला आणि लोणीकर पुन्हा विधानसभा निवडणूक लढले व आमदार झाले.

Jalna DCC Bank Politics; babanrao lonikar, Raosaheb Danve and Arjun Khotkar
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजेंसह 10 दिग्गज आऊट : गोरे, शंभूराज, मकरंदआबा, बाळासाहेब पाटलांना संधी

काल जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमातही लोणीकर यांनी, "मला मुलाला आमदार करायचे आहे, मला खासदार व्हायचे आहे," अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. यावर भाजपचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोणीकर आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनाही चिमटा काढला.

"अर्जुन खोतकर यांनाही लोणीकरांच्या आजाराची लागण झाली आहे. पण ते अजून जाहीरपणे 'मी विधानसभा लढवणार नाही,' असे सांगत नाहीयेत. त्यांच्या मनाची घालमेल सुरू आहे," असा टोला त्यांनी लगावला. नुकत्याच झालेल्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मुलगा अभिमन्यू खोतकर याला उमेदवारी मिळावी, यासाठी खोतकर यांनी प्रयत्न सुरू केले होते.

Jalna DCC Bank Politics; babanrao lonikar, Raosaheb Danve and Arjun Khotkar
Satara Dcc Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेसाठी 2011 ठराव : भाजपचे वर्चस्व; फलटण-पाटण वगळता राष्ट्रवादी-भाजप लढत होणार

परंतु तेथे सईद खान या अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी मिळाली. बबनराव लोणीकर यांच्याप्रमाणेच अर्जुन खोतकर हे देखील मुलगा अभिमन्यू याच्यासाठी जालना विधानसभा मतदारसंघ सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे. असे झाले, तर मग अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढवणार का? आणि कोणत्या मतदारसंघातून? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com