Babanrao Lonikar : शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख भाजपमध्ये; एकनाथ शिंदेंचा सगळा पक्षच आणला; भाजप आमदाराचा दावा

Udaysingh Borade joins BJP News : भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.
Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalna News : राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याची स्पर्धा काही थांबत नाही. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्याचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. उदयसिंह बोराडे आणि त्यांच्या समर्थकांनी कमळ हाती घेतल्याने लोणीकर भलतेच खूष झाले. संपूर्ण तालुका आता शतप्रतिशत भाजप झाल्याचा दावा त्यांनी भाषणात केला.

एवढ्यावरच न थांबता उदयसिंह बोराडे यांच्यासोबत शिवसेनेतील (Shivsena) सगळे पदाधिकारी कार्यकर्ते झाडून-पुसून भाजपमध्ये आले आहेत. उदय तू शिंदेंचा सगळा पक्षच आणला, असे म्हणत त्यांनी बोराडे यांचे अभिनंदन केले. तसेच आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देखील लोणीकर यांनी यावेळी दिली. या प्रवेशापेक्षा लोणीकर यांनी शिंदेचा अख्खा पक्षच भाजपात आणला, या त्यांच्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा, विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे.

प्रल्हादराव बोराडे आणि उदय बोराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा योग्य निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही, प्रत्येकाला सन्मान, योग्य संधी आणि संघटनेत काम करण्यासाठी सक्षम व्यासपीठ दिले जाईल, असे आश्वासन लोणीकर यांनी आपल्या भाषणात दिले.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षविस्तारासह मंठा तालुक्याच्या विकासासाठी केला जाईल. भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर लोणीकर चांगलेच संतापले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या राजकीय विचारानुसार पक्ष निवडण्याचा अधिकार आहे. विकासाच्या विचाराने आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी भाजपमध्ये प्रवेश करत असेल, तर त्याला धमकावण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा प्रकारचे दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. विरोधकांनी धमक्यांचे राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर यावे, असे आवाहन लोणीकर यांनी केले.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
NCP Sharad Pawar: मोठी बातमी: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोदी सरकारच्या 'डिलिमिटेशन' विधेयकाला पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी आतली बातमी फोडली

भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयसिंह बोराडे यांची आई सरोजा बोराडे नगरसेविका आहेत. तर वडील प्रल्हादराव बोराडे बाजार समितीचे संचालक आहेत. दहा पंधरा वर्षांपूर्वी प्रल्हादराव बोराडे हे देखील भाजपमध्ये होते नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यात भाजपची ताकद वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Maharashtra budget session: सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या; म्हणाल्या, 'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास होता'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.