Kalyan Kale : काँग्रेस खासदार कल्याण काळेंची भाजपची सत्ता असलेल्या पालिकेकडून कोंडी; रेल्वे भूयारी मार्गाची एनओसीच अडवली!

MP Kalyan Kale seeks NOC for railway underpass News : महापालिका आयुक्ताची भेट घेत कल्याण काळे यांनी रेल्वे भूयारी मार्गासाठीची एनओसी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली.
MP Kalyan Kale News
MP Kalyan Kale NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress News : काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांना मतदारसंघातील एका छोट्या कामासाठी सत्ताधाऱ्यांशी झगडावे लागत आहे. कधीकाळी देशावर सत्तर वर्ष राज्य करणाऱ्या पक्षाची आज झालेली ही अवस्था पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. छत्रपती संभाजीनगर शहरालगतचा काही भाग हा काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात येतो. याच भागातील भूयारी रेल्वे मार्गाच्या कामासाठी एनओसी मिळावी यासाठी काळे प्रयत्नशील होते. परंतु भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने ही एनओसीच अडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

अखेर कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्ताची भेट घेत रेल्वे भूयारी मार्गासाठीची एनओसी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. आता महापालिका काळे यांच्या या प्रत्यक्ष भेटीनंतर तरी विकास कामातील हा अडथळा दूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या शहरातून बीड बायपासकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या रेल्वे गेट नंबर -५६ येथे भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला आहे, पण त्यासाठी महापालिकेकडून नाहरकत (एनओसी) मिळण्यास विलंब होत असल्याने खासदार डॉ. कल्‍याण काळे यांनी शुक्रवारी (ता. २७) महापालिकेत आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली.

रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ३०) संयुक्तरित्या पाहणी करून अहवाल सादर करावा, असे आदेश डॉ. काळे यांच्या आक्षेपानंतर आयुक्तांनी दिले. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पण महापालिका हद्दीतील १० वॉर्डांच्या विकास कामांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यांनी तासभर आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी महापौर समीर राजूरकर यांचीही भेट घेतली.

MP Kalyan Kale News
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार झाल्यानंतर रेल्वे गेट नंबर-५६ साठी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार काम मंजूर झाले आहे. या पुलामुळे सिडकोकडून बीडबायबास म्हणजेच बाळापूरकडे जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. त्यासोबत मुकुंदनगर, राजनगर, म्हसोबानगर या भागातील नागरिकांची भुयारीमार्ग नसल्याने शहरात येताना मोठी अडचण होत आहे. रेल्वेच्या वेळेत नागरिकांना ताटकळावे लागते. या मंजूर कामासाठी महापालिकेची एनओसी आवश्‍यक आहे. ही एनओसी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आयुक्त अमोल येडगे यांना एनओसी तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले.

MP Kalyan Kale News
Sharad Pawar NCP: लोकसभेत नेमकं काय घडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खासदारांना बजावला 3 ओळींचा व्हिप; 5 दिवस उपस्थिती बंधनकारक

त्यांनी सोमवारी महापालिका व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून अहवाल सादर करावा, त्यानुसार लवकरात लवकर एनओसी दिली जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे डॉ. काळे यांनी पत्रकारांना सांगितले. शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम करताना अनेक चुका झाल्याचे नंतर निदर्शनास आले. पूलाला गळती लागली असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. चिखलामुळे नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या. जड वाहने पुलाखाली अडकून पडल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या चुका या गेट नंबर ५६ येथे होणार नाही याची काळजी घेऊ असेही काळे म्हणाले.

MP Kalyan Kale News
Congress news : पंतप्रधान-गृहमंत्री ही जोडी नक्की कोणता खेळ खेळत आहे? काँग्रेस नेत्याने व्यक्त केली भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.