Ambadas Danve On Bhagwat Karad : कराड चांगले डाॅक्टर, पण नेता होऊ शकत नाहीत..

BJP News : भाजप विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. आज या पक्षात मूळ भाजपचे किती ?
Ambadas Danve On Bhagwat Karad News
Ambadas Danve On Bhagwat Karad NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena (UBT) : आगामी लोकसभा निवडणुकीचे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना ठाकरे गट नेताच मानत नाही. माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केले. (Ambadas Danve On Bhagwat Karad) भागवत कराड हे चांगले डाॅक्टर आहेत, बालरोग तज्ञ म्हणून ते चांगल ऑपरेशन देखील करू शकतात. माणूस म्हणून देखील कराड चांगले आहेत. पण राजकारणात त्यांची ताकद त्यांना नेता म्हणावं अशी, अजिबात नाही. त्यांची ताकद काय आहे? हे तुम्हालाही चांगले माहित आहे, असा टोला दानवे यांनी लगावला.

Ambadas Danve On Bhagwat Karad News
Dhananjay Munde : मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी..

देशाची तिजोरी माझ्या ताब्यात आहे असं म्हणणाऱ्या कराडांनी (Dr.Bhagwat Karad) जिल्ह्यासाठी फुटकी कवडी तरी आणली का? असा सवाल देखील त्यांनी केला. मी दोन वर्षापासून जिल्ह्यात काम करतो आहे, (BJP)भाजपची लोकसभेची उमेदवारी मलाच मिळणार, असा दावा भागत कराड सध्या करतांना दिसतात. याच संदर्भात अंबादास दानवे यांना विचारले, तेव्हा त्यांनी वरील मत व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिंदेगट लढणार की भाजप ? हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. (Shivsena) आमच्यासमोर कुणीही उमेदवार असू द्या, आम्ही सगळ्यांना पुरून उरू. इथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच जिंकणार, असा दावा देखील दानवे यांनी केला.

जिल्ह्याचे नेतृत्व करू पाहणारे भागवत कराड दोन वर्षापासून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. माझ्या हातात देशाची तिजोरी आहे असे भाषणातून सांगतात. मग या जिल्ह्यासाठी, शहरासाठी काय आणले? फुटकी कवडी तरी आणली का? एखादं उदाहरण ते सांगू शकतील का? असे म्हणत दानवे यांनी कराडांना आव्हान दिले.

भाजप कधीकाळी विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. आज या पक्षात मूळ भाजपचे कितीजण आहेत? सगळे चेहरे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. नव्या लोकांना भाजपने आपल्या दुकानाची दारं उघडी केली आहेत, पण ज्यांनी पक्ष वाढवला त्या जुन्या कार्यकर्त्यांना मात्र दुकानातल्या स्टोरेज रुममध्ये टाकून दिले आहे, असा चिमटाही दानवे यांनी यावेळी काढला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.