Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी उद्या मतदान; निलंगेकर विरुद्ध देशमुख आमने-सामने!

Latur DCC Bank News : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती राहिली नाही, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसची साथ दिली, त्यामुळे भाजपामध्येही फूट पडली.
Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar
Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा बँकेचा कारभार गेल्या चाळीस वर्षांपासून सुरळीत सुरू असताना काही लोकांनी उगाच सहकाराच्या या क्षेत्रात लुडबुड सुरू केली आणि निवडणूक लादली, असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी प्रचारा दरम्यान केला. तर तीस वर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही, आणि आपल्या मर्जीतल्या संचालकांची वर्णी लावून घ्यायची, या एकाधिकारशाहीला आम्ही ब्रेक लावला.

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूका होत आहे, हाच आमचा पहिला विजय असल्याचा दावा करत भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर व त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलला आव्हान दिले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती राहिली नाही, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसची साथ दिली, त्यामुळे भाजपामध्येही फूट पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संजय बनसोडे हे निलंगेकर यांच्या पॅनलसोबत आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी मुलासाठी माघार घेत पॅनलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. तर अरविंद पाटील विरुद्ध त्यांच्या काकू यांच्यात निलंग्यामध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या परिवर्तन पॅनलने काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेतील कारभार, आपल्या संस्था, कारखाना आणि नातेवाईकांना कर्ज वाटप केल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

तर अमित, धीरज देशमुख व दिलीपराव देशमुख यांनी तुमच्या सरकारने बँकेला उत्कृष्ट कामासाठी दिलेले पुरस्कार खोटे आहेत का? असा पलटवार करत निलंगेकरांचे आरोप खोडून काढले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून लातूर जिल्हा बँकेच्या प्रचारामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता कायम राहणार की परिवर्तन घडणार? हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar
NCP Politics : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीचे खरे कारण समोर

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील नेते बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या गटांमध्ये समन्वयाचे चित्र दिसत असतानाच भाजपचे (BJP) आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar
BJP challenges Congress : निलंग्यात पुन्हा भाऊबंदकी आमने-सामने; लातूर डीसीसी बँकेसाठी काकीविरुद्ध पुतण्या लढत रंगणार!

अशा घडल्या वेगवान घडामोडी..

निवडणुकीत संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 999 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चार जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये रेणापूरमधून सर्जेराव मोरे, अहमदपूरमधून अविनाश जाधव, अनुसूचित जाती प्रवर्गातून विवेक सिरसाट आणि औसा मतदारसंघातून शोभा पवार यांचा समावेश आहे. निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दुष्काळी परिस्थितीचे कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

बँकेवर प्रशासक नेमून कारभाराची चौकशी करावी, अशीही त्यांची भूमिका होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली. त्यानंतर १२ ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावरील रिझर्व्ह बँकेचा निर्णय. सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदी राहिल्याच्या कारणावरून १८ सप्टेंबरला आरबीआयने त्यांना संचालकपदावरून दूर करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका बाबासाहेब पाटील यांनी घेतली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

19 ऑक्टोबरच्या छाननी प्रक्रियेत माजी जिल्हा बँक अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे धीरज देशमुख यांची प्रक्रिया मतदारसंघातून बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, न्यायालयीन हस्तक्षेपानंतर भारत चामले यांचा अर्ज वैध ठरला आणि धीरज देशमुख विरुद्ध भारत चामले अशी थेट लढत निश्चित झाली. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. या प्रक्रियेत 17 उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर चार जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित जागांसाठी बहुतांश ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती निश्चित झाल्या.

Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

प्रमुख लढतींमध्ये लातूरमध्ये हेमंत पाटील विरुद्ध शरद शिंदे, निलंगा, संगीता पाटील विरुद्ध अरविंद पाटील निलंगेकर, प्रक्रिया मतदारसंघातून धीरज देशमुख विरुद्ध भरत चामले, सहकारी पतसंस्था- अशोक गोविंदपूरकर विरुद्ध ऋषिकेश कराड, महिला मतदारसंघ-शीतल पाटील, गीतांजली लांडगे आणि सुरेखा मुरुडकर अशा लढती होत आहेत.

अपहरण आणि उमेदवारी माघारीवरून गंभीर आरोप

दरम्यान,निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचा आरोपही समोर आला. 28 ऑक्टोबरला भाजपचे उमेदवार रवी जाधव यांचे अपहरण करून त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 8 नोव्हेंबरला पाच जणांना जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणात भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरही तक्रारीत आरोप करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.