Latur Loksabha Constituency : राज ठाकरेंचा पाठिंबा, पण महायुतीची मनसेकडे पाठ...

Loksabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.
Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

सुधाकर दहिफळे-

Latur News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गुढी पाडव्याच्या मुंबईतील मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यातील महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. अगदी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मनसेच्या नेत्यांची यादीही पाठवून दिली. मात्र, महायुतीकडून कुठलाच प्रतिसाद मनसेला मिळत नाहीये. राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला, पण महायुतीने मात्र मनसेकडे पाठ फिरवल्याचे चित्र लातूर लोकसभा मतदारसंघात दिसत आहे.

महायुतीच्या मेळाव्यासाठी मनसेला निमंत्रण दिले नसल्याने स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप व इतर मित्र पक्षांचा मेळावा उद्या, 16 एप्रिल रोजी शहरात होते आहे. मात्र, या मेळाव्याचे निमंत्रण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांना देण्यात आलेले नाही.

Eknath Shinde, Raj Thackeray
Ajit Pawar Vs Mohite Patil : "मोहिते-पाटील स्वार्थी अन् मतलबी," अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. राज ठाकरे यांनी देशासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगत केवळ नरेंद्र मोदींसाठी आपला महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपला पाठिंबा असेल, असे दसरा मेळाव्याच्या सभेत जाहीर केले होते. राज ठाकरे यांच्या निर्णयावर टीकाही झाली, त्यांच्यावर भूमिका बदलल्याचे आरोपही झाले.

पण त्याकडे दुर्लक्ष करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीच्या प्रचारासाठी मनसेच्या नेत्यांची बैठक घेत त्यांची यादी महायुतीच्या नेत्यांकडे पाठवली. जेणेकरून राज्यातील विविध मतदारसंघात हे नेते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील. परंतु महायुतीने मात्र राज ठाकरेंचा पाठिंबा फारसा गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. लातूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याला मनसेला बोलावण्यातच आलेले नाही. त्यामुळे मनसेचे जिल्ह्यातील नेते नाराज झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्याच्या मेळाव्याला मंत्री संजय बनसोडे, महायुतीतील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासप, रिपाई या सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिका-यांच्या नावे कार्यक्रम पत्रिका तयार करुन सोशल मिडीयाव्दारे प्रसारीत करण्यात आल्या आहेत. मनसेच्या (MNS) पदाधिका-यांची नावे मात्र यात नसल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात मनसेचे संघटन चांगले असून कार्यकर्त्यांची फळी आहे. यात युवा कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.

असे असताना मनसेला डावलल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी व युतीच्या उमेदवारांनी सन्मानाने बोलावल्यानंतर प्रचारामध्ये सहभाग घेण्यास सांगितले आहे. यासाठी कोणत्या जिल्ह्यात मनसेच्या कोणत्या नेत्याशी संपर्क करायचा याची यादी पक्षाकडून भाजपाच्या नेत्यांना देण्यात आली आहे.

Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde News : कोल्हापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री म्हणाले, 'ये तो बस ट्रेलर है...'

भाजप (BJP) नेत्यांनी आम्हास बोलावल्यास आम्ही प्रचारात उतरणार आहोत. परंतू लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही आम्हाला कोणीही प्रचारात सहभागी होण्यासाठी संपर्क केला नाही. तसेच भाजप उमेदवाराने प्रचाराच्या कोणत्याही बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो वापरलेला नाही, अशी खंत मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी व्यक्त केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde, Raj Thackeray
Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंचे मोहिते पाटलांना प्रत्युत्तर; ‘सोलापूरकरांनी माझं पार्सल दिल्लीला पाठविण्याचं ठरवलंय’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com