Latur ZP Election News : लातूर 'झेडपी'मध्ये भाजपाचाच अध्यक्ष होणार; आता निलंगेकर-पवारांमध्ये रस्सीखेच

Mahayuti alliance Latur politics News : भाजप 18 जागा जिंकत महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यामुळे सहाजिकच अध्यक्ष पदावर त्यांचा दावा महत्वाचा मानला जातो.
MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपालाच मिळणार हे मुंबईत महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या चर्चेत महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये झेडपीतील सत्तेच्या वाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. आता या पदावर आपल्या समर्थक सदस्याची वर्णी लावण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील भाजपा (BJP) नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण आणि अंतर्गत गटबाजी याचा फटका महापालिका निवडणुकीत पक्षाला बसल्याची चर्चा आहे. यातून नेत्यांनी काही धडा घेतला नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेवर शतप्रतिशत भाजपाची एकहाती सत्ता आणण्याचे प्रयत्नही फोल ठरले. 18 जागा जिंकत भाजपा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यामुळे सहाजिकच अध्यक्ष पदावर त्यांचा दावा महत्वाचा मानला जातो.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Parbhani ZP election : धाराशिव, परभणी झेडपीत ऐनवेळी महायुतीने गेम पलटावल्याने विरोधकांचे मनसुबे धुळीस! 'त्या' एका निर्णयाने सत्तेचे गणितच बदलले !

मुंबईत महायुतीतील सर्वपक्षीय नेते, सदस्य आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदाचा उमेदवारही निश्चित झाल्याचे बोलले जाते. आता नेमका हा उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गुडबुकमधला आहे, की मग अभिमन्यू पवार यांच्या? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Murlidhar Mohol News : मंत्री मुरलीधर मोहोळ सक्तीच्या विश्रांतीवर, 29 वर्षांपूर्वीच दुखणं उद्भवलं अन्…, स्वतः सांगितलं काय झालं?

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेले मर्यादित यश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) जिल्ह्यातील नेते व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संभाजी पाटील निलंगेकर यांचा नगरपालिका निवडणुकीत झालेला वाद या पार्श्वभूमीवर भाजपाने सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे पक्षात स्पर्धाही मोठी आहे. 16 मार्च रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Sunil Tatkare : तटकरे थेट कोर्टात, शिंदेंच्या आमदाराला मोठा झटका बसणार? रायगडमध्ये नवा राजकीय स्फोट?

सरशी कोणाची?

पालकमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. आता तो अभिमन्यू पवार की संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गटाचा आहे? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. भाजपकडून औसा तालुक्यातील लोदगा गटातून पुनम मुक्ता, देवणी तालुक्यातील वंलाडीतून उषा पाटील तर निलंगा तालुक्यातील सरवडी गटातून कविता गोरे व रेणापूर तालुक्यातील खरोळा गटातून शिवकन्या गोडभरले या विजयी झालेल्या आहेत.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Patan Politic's : देसाई गटाचा विजयी वारू अखेर पाटणकरांनी रोखला; राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्थेत दणदणीत विजय

यापैकी पुनम मुक्ता आणि उषा पाटील यांच्यापैकी एकीच्या नावावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब कालच्या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उषा पाटील या संभाजी पाटील निलंगेकर समर्थ आहेत, तर पुनम मुक्ता या आमदार अभिमन्यू पवार यांचे कट्टर समर्थक संतोष मुक्ता यांच्या पत्नी आहेत.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
Sunil Tatkare : तटकरे थेट कोर्टात, शिंदेंच्या आमदाराला मोठा झटका बसणार? रायगडमध्ये नवा राजकीय स्फोट?

उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला

18 जागा असलेल्या भाजपला अध्यक्ष पद, तर 12 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपाध्यक्ष पद देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडे सत्तेच्या चाव्या असल्या तरी त्यांच्याकडे सर्वसाधारण महिला सदस्य नाही. त्यामुळे उपाध्यक्ष पदासह काही महत्त्वाची सभापती पद आपल्याकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar- Abhimanyu Pawar Now Friend Latur News
North Korea Missile Launch : संपूर्ण जगाला ज्याची भीती अखेर तेच घडलं! किम जोंग-उन यांनी क्षेपणास्त्रे डागली, तिसरं महायुद्ध भडकणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com