Latur ZP Result 2026: 'काय म्हणतयं लातूर?' महापालिकेनंतर ZP निवडणुकीतही 'काँग्रेसच' मोठा पक्ष म्हणतंय लातूर... : अमित देशमुखांचे हात मजबूतच

Latur ZP Election Result 2026 : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असून, अमित देशमुख यांचे नेतृत्व अजूनही भक्कम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
Congress leader Amit Deshmukh interacting with party workers after Latur Zilla Parishad election results, reflecting strong leadership and voter support across the district.
Congress leader Amit Deshmukh interacting with party workers after Latur Zilla Parishad election results, reflecting strong leadership and voter support across the district.Sarkarnama
Published on
Updated on

Congress becomes the single largest party in Latur ZP Election 2026 : लातूर महापालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसचे आमदार आणि जिल्ह्यातील नेते अमित देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत मतांचे गणित जुळवले.

काँग्रेसने 43 आणि वंचितच्या 4 अशा एकूण 47 जागाचे बहुमत मिळवत महापालिकेवर झेंडा फडकला. यानंतर जिल्हा परिषदेत मोठ्या आत्मविश्वाने मैदानात उतरलेल्या अमित देशमुख यांच्या काँग्रेसला मोठे यश मिळाले. पण राज्यात युती असल्याने निम्म्या जागांवर घसरगुंडी झाल्यानंतरही भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्तेत बसणार आहे.

प्रत्यक्षात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नगरपालिकेतील विजयानंतर विचारलेल्या काय म्हणतयं लातूर? या प्रश्नाचे उत्तर महापालिका आणि आता जिल्हा परिषदेत मतदारांनी 'काँग्रेसच मोठा पक्ष म्हणतंय लातूर'ने दिले आहे. अमित देशमुख यांचे नेतृत्व लातूरमध्ये अजूनही भक्कम असल्याचे कालच्या (ता.09) निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विलासरांवाच्या नावावर किती दिवस राजकारण चालणार? असा हल्ला भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख यांच्यावर निवडणुक प्रचारातून चढवला होता. पण विलासरावांची पुण्याई आणि स्वतःच्या हिमंतीवर राजकारण असे उत्तर अमित देशमुख यांनी आपल्या नेतृत्वातून दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

लातूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेली नवी घोषणा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.

Congress leader Amit Deshmukh interacting with party workers after Latur Zilla Parishad election results, reflecting strong leadership and voter support across the district.
Latur ZP election results : श्वास रोखणारा निकाल! जावा-जावांच्या लढाईत काँग्रेसचा दोन मतांनी डंका

काय म्हणतय लातूर याचे उत्तर लातूरकरांनी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता देऊन दिले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही 59 पैकी 23 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून देत महापालिकेतील ट्रेंड लातूरकरांनी मिनी मंत्रालयातही कायम ठेवला. मात्र राज्याच्या सत्तेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे अमित देशमुख यांचे स्वप्न भंगणार आहे.

Congress leader Amit Deshmukh interacting with party workers after Latur Zilla Parishad election results, reflecting strong leadership and voter support across the district.
Latur ZP Election Result: लातूर झेडपीत काँग्रेसच मोठा पक्ष, पण...; भाजप 'असा' फिरवणार राजकीय खेळ

भाजपची गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या जिल्हा परिषदेत कमालीची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 36 सदस्य संख्या असलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत केवळ 18 जागा जिंकता आल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत 12 जागा जिंकल्या आहेत. शिंदेंची शिवसेना एक जागा जिंकून अस्तित्व दाखवू शकली तर दोन जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com