Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang SonwaneSarkarnama

Bajrang Sonwane On Dhananjay Munde : 'पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्याला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला माहीत...'

Beed Loksabha Election 2024 : 'पालकमंत्री किती बहुरंगी आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही...'

Beed News : बहुरंगी कोण आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्यालाच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असा पलटवार इंडिया आघाडतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला.

महायुतीतील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे Pankaja Munde यांचा बुधवारी(ता.24) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर ‘बहुरंगी उमेदवार, शेती नसलेला शेतकरी पुत्र’ अशी टोलेबाजी केली होती.

Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Beed Lok Sabha Election : बीडमध्ये मोठी घडामोड; जरांगेंच्या आंदोलनातला शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात...
Summary

त्याला बजरंग सोनवणे Bajarang Sonwane यांनी गुरुवारी प्रचार दौऱ्यात उत्तर दिले. बजरंग सोनवणे यांनी बुधवारी शिरुर कासार व धारुर तालुक्यांतील विविध गावांत भेटी दिल्या. त्यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या टिकेवर चांगलाच पलटवार केला. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा बहुरंगीपणा हा फक्त बीड जिल्ह्यालाच माहीत आहे असे नाही तर अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पालकमंत्री किती बहुरंगी आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही असा पलटवार बजरंग सोनवणे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बजरंग सोनवणे यांनी साधेपणाने अर्ज भरला तर पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शक्तिप्रदर्शन केले. मागच्या आठवड्यापासून प्रचारांत आरोप - प्रत्यारोप व एकमेकांवर टीकास्त्र सुरु आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Hingoli Lok Sabha News : हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा, गोविंदाही प्रचारात उतरवले; आता तरी बाबुराव येणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com