Jalna Lok Sabha Constituency : महाआघाडीला भलताच काॅन्फिडन्स; उमेदवार देण्याआधीच दोन लाख मताधिक्याचा दावा...

Loksabha Election 2024 : जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार डाॅ. कल्याण काळे भेटीगाठी घेत आहेत. उमेदवार जाहीर होण्याआधीच महाआघाडीचा उमेदवार दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याचा दावा त्यांनी केला आहे.
Dr. Kalyan Kale
Dr. Kalyan KaleSarkarnama

Jalna, 02 April : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, महायुती-महाविकास आघाडीने काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले, तर काही ठिकाणचे उमेदवार अद्याप ठरायचे आहेत. पण त्याआधीच दोन्ही पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? हे अद्याप ठरलेले नाही.

संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांनी मतदारसंघात बैठका, मेळावे आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पण उमेदवारी जाहीर होण्याआधीच जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचा उमेदवार दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपच्या विरोधात जो बोलेल, त्याच्या मागे ईडी लावली जात असल्याची टीकाही काळे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Kalyan Kale
Praniti Shinde Mangalvedha Tour : वयोवृद्ध महिलेने गाडी अडवत प्रणिती शिंदेंपुढे मांडली व्यथा; ‘गावात प्यायला पाणी नाय; पण दारू भरपूर हाय...’

भाजपने दुसऱ्या टप्यात जाहीर केलेल्या यादीत मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि नांदेड या चार मतदारसंघांचा समावेश होता. जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. संभाव्य उमेदवार म्हणून काळे मतदारसंघात फिरत असून, भाजपवर टीका करताना दिसत आहेत.

भारतीय जनता पक्ष केवळ दोन धर्मात, जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असून, ईडीचा धाक दाखवून इतर पक्षाच्या नेत्यांना धमकावत आहे. तू चूप बस नाहीतर तुला ईडी लावेल, असाच सगळा कार्यक्रम सुरू आहे. जनता दबावाच्या राजकारणाला आता भीक घालणार नाही, लोक उघडपणे भाजपच्या विरोधात उभे राहू लागले आहेत. त्यामुळे या वेळी जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तब्बल 2 लाख मतांनी विजयी होणार, असा दावाही कल्याण काळे यांनी केला आहे.

Dr. Kalyan Kale
Solapur Loksabha 2024 : फडणवीस, सातपुतेंची अडचण वाढणार?; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजप केवळ आश्वासन देत असून, विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करीत आहे. दोन जातीत आणि धर्मात तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे एकमेव काम सध्या देशात आणि राज्यात सुरू आहे. इतर पक्षातील नेत्यांना ईडीचा धाक दाखवून पक्षांतर करून घेतले जात आहे. जनतेला आता हे सगळे माहीत झाले असल्याने जनता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचे काळे म्हणाले. रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम समाजाच्या गाठीभेटीवर डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांनी भर दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Dr. Kalyan Kale
Hatkanangle Lok Sabha Constituency : धैर्यशील माने-राजू शेट्टी यांच्या लढतीत ‘वंचित’ची उडी; ठाकरे गटाचा सस्पेन्स कायम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com