Manoj Jarange claims : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल मनोज जरांगेंचा मोठा दावा; म्हणाले, 'दिल्लीतले लोक म्हणतात ती बाई…'

Manoj Jarange's latest statement News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर आरोप करीत कोंडी केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर आरोप करीत कोंडी केली आहे. माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळं आहे. वेळ आली की फोडणार, असा इशारा त्यांनी दिला. 'त्या' ऑडिओ क्लिपवरून मला माहिती मिळाली आहे. दिल्लीतले लोक म्हणतात की, ती बाई खोटे नाही बोलू शकत. ती बाई खूप आत्मविश्वासाने क्लिपमध्ये बोलते आहे, असा दावा मनोज जरांगेंनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे प्रसार माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, '500 कोटींची ही ऑडिओ क्लिप खरी आहे. दोघांनी तुटून पडून यातले सत्य बाहेर काढायला हवे. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. ही क्लिप काही एआय नाही, ही खरी आहे. याच्यामध्ये कोणी गरीब असते तर त्यांना आतापर्यंत जेलमध्ये टाकले गेले असते. ते भाजपच्यासंबंधीत आहेत. त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकले नाही. '

जरांगे पाटलांनी दिला एकनाथ शिंदेंना इशारा

याप्रकरणी गुन्हाच दाखल झाला नाही. ही देशातली आणि राज्यातली पहिली एसआयटी अशी आहे की, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चौकशीला सुरुवात केली आहे, असे होत नाही. याचा अर्थ ते ही क्लिप खोटी ठरवणार आहेत. हा विषय लहान नाही. एकनाथ शिंदेंनी हा विषय किती गांभिर्याने घेतला याची आम्हाला कल्पना नाही, पण याचे पडसाद आणि भोग भोगावे लागणार आहेत. जर हे त्याच्या मुळाशी गेले नाहीत. तर त्याचे परिणाम मात्र तळागाळातल्या, गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत, असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी शिंदेंना दिला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर जरांगेंचा आणखी एक धमाका! फडणवीस-शिंदेंना थेट इशारा; म्हणाले, 'पुढची क्लिप डेंजर आहे!'

'माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे'

तुम्ही जर हे सोडून द्याल, तर मग आणखी पुढेही काही प्लॅन्स आणि किती प्लॅन असतील हे तुम्हाला माहिती आहे का मग? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मला माझ्याबद्दल माहिती आहे, माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे आहे. वेळ आली की फोडणार, असेही यावेळी जरांगे पाटील (Manoj Jarange patil) म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: मिसेस अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलेलं का..? ; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान

एकनाथ शिंदेंना दिला सल्ला

ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, तुम्ही घेतलेच नाही तर तुम्ही का घाबरता, तुमच्यामुळे त्यांचं आहे. त्यांच्यामुळं तुमचं नाही, मग तुम्ही का गप्प बसला आहात. आपल्यासंबंधी त्याठिकाणी विषारी षडयंत्र रचले जात असेल तर त्याठिकाणी आपण नाही का रहावे, असा सल्ला जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.