Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींच्या आरोपानंतर बीडमध्ये बॅनरवॉर; जरांगे पाटील विरुद्ध शिंदे समर्थक संघर्ष पेटणार?

Manoj Jarange Patil 500 crore allegation against Eknath Shinde triggers political counterattack, with Shinde supporters putting up banners Beed highlighting Maratha reservation decisions :जरांगे पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना समर्थकांनी कुणबी प्रमाणपत्रे, एसईबीसी आरक्षण आणि मराठा आंदोलकांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला.
Manoj Jarange vs Eknath Shinde
Manoj Jarange vs Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Banner Row : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून 500 कोटी रुपयांचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. भाजपने यावरून खुलासा केला असला, तरी एकनाथ शिंदे यांचे शिलेदार जरांगे पाटील यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर शंकास्पद टिप्पणी करत, आरोप सुरू केले आहेत. यातच बीडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जरांगे पाटील यांना डिवचणारे बॅनरबाजी करून आगीत तेल ओतण्याचे काम केले. एकनाथ शिंदे शिवसेना आणि जरांगे पाटील यांच्यातील हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.

जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी घेतलेल्या राजकीय भूमिकेचे समर्थन करताना, शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच! हा उपहासात्मक मथळा वापरून बीडमध्ये जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी केली आहे.

उपहासात्मक बॅनरबाजी करताना, जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची यादी मांडली आहे. जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ केलेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

Manoj Jarange vs Eknath Shinde
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार? पाच जागांवर पेच

शिंदे साहेब खरंच तुमचं चुकलं!

मराठवाड्यात गेल्या 40 वर्षात फक्त 2 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते. शिंदे साहेब तुम्ही दोन वर्षात 3 लाख 50 हजार प्रमाणपत्र शोधून दिले. मराठा समाजाला 10% एसईबीसी आरक्षण दिले. मराठवाड्यातील 3 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेतला. आंतरवालीतील सभेमुळे गरीब शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून 1 कोटी 43 लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसानपाई म्हणून दिले.

Manoj Jarange vs Eknath Shinde
Pratap Sarnaik On Jitendra Awhad threat : जितेंद्र आव्हाडांना धमक्या, सरनाईकांचा आनंद परांजपेंकडे पाहून टोला; नेमकं काय म्हणाले?

चार राजकीय सर्टिफिकेटसाठी...

मराठा आंदोलनामधील बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व सरकारी नोकरी दिली. मुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल बाजूला ठेवून समाजाच्या भावना जाणून घेत 2 वेळा उपोषण सोडवले. 5300 मराठा मुलांना अधिसंख्या पद देऊन क्लासवन अधिकारी केले. बंद अवस्थेत असलेल्या (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची 10 लाख मर्यादा कर्ज योजना 15 लाख करून तुम्ही उद्योजक घडवले. सारथी संस्थेला हजारो कोटींचा निधी देऊन तुम्ही आयएएस, आयपीएससह शेकडो क्लासवन अधिकारी बनवले. सारथीच्या प्रशस्त पुण्यातील मुख्य कार्यालयासह नाशिक, कोल्हापूर, नागपुर, लातूर, नवी मुंबई अशी विभागीय कार्यालये व वस्तीगृह तयार केले. एवढं करूनही शिंदे साहेब खरंच तुमचं चुकलं! चार राजकीय सर्टिफिकेटसाठी, तुमचा बाजार उठवतो. ही भाषा..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com