BJP Parbhani politics : गंगाखेड पंचायत समितीवर भाजपचा भगवा! तरुणाच्या खांद्यावर सभापतीपदाची धुरा; विरोधकांचे धाबे दणाणले

Gangakhed Panchayat Samiti election News : राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ठिकाणी भाजपने तरुणाच्या खांद्यावर सभापतीपदाची धुरा टाकत विरोधकांना चकित केले आहे.
Pune BJP
Pune BJPsarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्हयातील नऊ पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी बुधवारी पार पडल्या. या निवडकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गंगाखेड पंचायत समितीवर भाजपचा भगवा फडकला आहे. या ठिकाणी भाजपने मोठा डाव टाकला असून राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ठिकाणी भाजपने तरुणाच्या खांद्यावर सभापतीपदाची धुरा टाकत विरोधकांना चकित केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला बहुमत आहे. त्यामुळे भाजपचा पंचायत समिती सभापती होणार आहे. त्यानुसार आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड केली आहे. मनोज मुंडे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वात तरुण सभापती झाला आहे.

Pune BJP
BJP election strategy : बिहार निवडणुकीत भाजपने केलेल्या खर्चाचे धक्कादायक आकडे समोर, निकालही मनासारखा; काँग्रेस जवळपासही नाही...

भाजपचा 'युवा' पॅटर्न!

गंगाखेड पंचायत समितीवर भाजपने केवळ ताबाच मिळवला नाही, तर राज्यातील सर्वात तरुण सभापती निवडून देत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अनुभवापेक्षा उत्साहाला दिलेल्या या संधीमुळे विरोधकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. सत्तेच्या राजकारणातला भाजपचा हा खरा 'मास्टरस्ट्रोक' मानला जात आहे. भाजपने या ठिकाणी सभापतीपदाची युवा नेत्याला संधी दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Pune BJP
Shivsena-BJP Alliance : अब्दुल सत्तारांना सलग दुसरा धक्का : सोयगाव पंचायत समितीत संजना जाधवांच्या मदतीने भाजपचा सभापती

सभापती झालेले मनोज मुंडे हे गंगाखेड तालुक्यातील आकोली पंचायत समिती गणमधून निवडून आले आहेत. या ठिकाणी तरुण चेहऱ्याला संधी देऊन भाजपाने राजकीय भवितव्य ठरवले आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. या दोन्ही सरकारच्या आणि आमदारांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्याचा निर्धार मनोज मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Pune BJP
Congress MLA : काँग्रेसला धक्का, नेत्याची आमदारकी रद्द; कोर्टाने भाजपच्या माजी मंत्र्यांना केले विजयी घोषित...

येत्या काळात गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच नागरिकांना कुठल्या समस्या असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्या समस्या सोडवल्या जातील असे देखील जनतेला आव्हान केले आहे.

Pune BJP
NCP News : पुणे जिल्हा ताब्यात घेण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचा फक्त एक सभापती : 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com