Manoj Jarange : चर्चा तर होणारच! जंगी मिरवणुकीतून वाट काढत जरांगेंनी घेतली शिवाजीराव पंडितांची गळाभेट   

Shivajirao Pandit : शिवाजीराव पंडित यांनीही त्यांना प्रेमाने अलिंगन दिले.
Shivajirao Pandit, Manoj Jarange
Shivajirao Pandit, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : निर्णायक सभेपूर्वी शहरातून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक निघाली. सुभाष रोडवरुन फेरी जात असताना जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित फेरीच्या स्वागतासाठी दारात थांबले होते. हे पाहून मनोज जरांगे वाहनातून उतरले व हजारोंच्या गर्दीत जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतला. शिवाजीराव पंडित यांनीही मनोज जरांगे पाटील यांना प्रेमाने मिठी मारली.

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज निर्णायक इशारा सभा झाली. तत्पुर्वी, शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन माळीवेस, सुभाष रोड मार्गे ही फेरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे येत होती. फेरीतील समाज बांधवांसाठी जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित (Shivajirao Pandit) यांनी आपल्या शिवछत्र निवासस्थानासमोर चहा-पाण्याची सोय केली होती. (Maratha Reservation)

Shivajirao Pandit, Manoj Jarange
Maratha Reservation : मुंबईत 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण; मनोज जरांगेंनी पुन्हा रणशिंंग फुंकले

हजारोंच्या गर्दीत उघड्या वाहनातून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मिरवणुकीवर जागोजागी पुष्पवृष्टी होत होती व त्यांचे भव्य स्वागत होत होते. मनोज जरांगे यांनी जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित हार घेऊन उभा असल्याचे पाहताच ते वाहनातून उतरले आणि गर्दीतून वाट काढत शिवाजीराव पंडित यांच्याजवळ पोचले. शिवाजीराव पंडित यांनीही त्यांना प्रेमाने अलिंगन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मुळचे बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील मातोरीचे रहिवासी असून पुर्वी हा भाग गेवराई मतदार संघात होता. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व शिवाजीराव पंडित यांनी केलेले आहे. 85 वर्षीय शिवाजीराव पंडित मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात आजही त्याच जोशाने सहभागी असतात, याची जरांगे पाटलांना माहिती आहे.

अंतरवाली सराटी येथे आंदोलनावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधातही पंडित पुढे होते. त्यामुळे जरांगे वाहनातून उतरले आणि गर्दीतून जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजसिंह पंडित व त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

(Edited By - Rajanand More)

Shivajirao Pandit, Manoj Jarange
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com