Maratha Reservation : अंतरवालीतील उपोषणाचा मंडप हटवण्यासाठी मोठ्या हालचाली; जरांगे पाटलांनी फोन करताच...

Manoj Jarange Patil : उपोषण स्थळावरून मंडप हटवण्यासाठी पोलिसांचा दबाव, जरांगे पाटील फोनवरून बोलल्यानंतर कारवाई थांबवली
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना इकडे अंतरवाली सराटी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापले होते. पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील तयार झाले. आपल्या काही सहकाऱ्यांना साखळी उपोषणासाठी बसवून ते छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असतानाच अचानक अंतरवाली सराटीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बसलेल्या काही सहकाऱ्यांना उपोषण मागे घेऊन व्यासपीठ रिकामे करा, मंडप काढून घ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. या संदर्भातील माहिती मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात कळतात त्यांनी उपचार सोडून अंतरवालीकडे निघण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Uddhav Thackeray News : ...तर जरांगेंची 'चिवट'पणाने चौकशी करा! ठाकरेंचा रोख मुख्यमंत्र्यांचे विश्वासू चिवटेंवर?

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी उपोषण हटवण्यासाठी दबाव आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. तुमच्या शब्दाला आणि पोलिस अधीक्षक साहेबांच्या सूचनेला मान देऊन मी उपचारासाठी इथे आलो. मग आता आमचे बेमुदत उपोषण मागे घ्यायला का सांगितले जात आहे. मंडप, व्यासपीठ रिकामी करण्याचे आदेश कसे काय दिले जात आहेत ? लोकशाहीत आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार आहे की नाही? असा संतप्त सवाल केला.

तुम्ही मराठ्यांची चेष्टा चालवली आहे काय ? मराठा समाजाला या राज्यात काही किंमत आहे की नाही. की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले म्हणून तुम्ही दबाव आणून आम्हाला उपोषण मागे घ्यायला भाग पाडणार आहात, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही उपोषण स्थळावर गेलेल्या अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्यास सांगतो. पण तुम्ही उपचार सोडून अंतरवालीकडे येऊ नका, अशी विनंती केली.

यावर तुम्ही तातडीने उपोषण स्थळी आलेल्या पोलिस व इतर अधिकाऱ्यांना थांबवा तरच मी इथे थांबतो, नाहीतर मी निघालो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांचे सहकारी संजय कटारे, ॲड. अमोल लहाने, किशोर मरकड, यांना अंबड पोलिसांनी स्थानबध्द केले असून अंतरवाली येथील मंडप, व्यासपीठ, महाराजांचा पुतळा हलवण्यासाठी दबाव वाढवण्यात येत असल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे.

मनोज जरांगे यांनी जालन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर उपोषण स्थळी गेलेल्या पोलिस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना थांबवण्यात आले आहे. याची माहिती मनोज जरांगे यांना दिल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जरांगे पाटील यांनी पुन्हा आतमध्ये जाऊन उपचार घेतले.

(Edited By-Ganesh Thombare)

Manoj Jarange Patil
PM Modi News: मोदींच्या सभेसाठी २६ एकरवर मंडप, दोन हजार एसटी बस, तीन लाख महिला येणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com