Radhakrishna Vikhe : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्र्यांचा मोठा निर्णय; जायकवाडी धरणातून पाण्याची तीन आवर्तने सोडणार

Marathwada Drought: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून महिन्याच्या अंतराने तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
release three water rotations from Jayakwadi Dam for Marathwada
release three water rotations from Jayakwadi Dam for MarathwadaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought News: पावणे तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला काहीसा दिलासा देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. रब्बी हंगाम आणि जी थोडीफार पीकं हाताशी येऊ शकतात, त्यांना जगवण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी जायकवाडी धरणातून तीन आवर्तने सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची स्थिती चांगली असल्याचे सांगत समन्यायी पाणी वाटपानूसार नाशिककडील वरच्या धरणातून ८ टीएमसी पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगीतले होते.

या पार्श्वभूमीवर आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते. रब्बी हंगाम, रब्बी पिके, जनावरांसाठी पाणी आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता एक महिन्याच्या अंतराने तीन आवर्तने सोडण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. यातील पहिले आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने आणि योग्य नियोजन करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

release three water rotations from Jayakwadi Dam for Marathwada
Satish Chavan: सतीश चव्हाणांनी पराभव तर मान्य केलाच अन् त्याची कारणेही सांगितली; जवळच्या लोकांनीच....

रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यातून पाच नोव्हेंबर पासून पहिले आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. प्रारुप नियोजनानुसार 15 नोव्हेंबर पासून पहिले आवर्तन प्रस्तावित होते परंतु मराठवाड्यात पडलेला दुष्काळ, पिकांची गरज आणि जमिनीतील ओलावा यामुळे लोकप्रतिनिधींनी पहिले आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली होती.याच बैठकीत २०८ किलोमीटरच्या कालव्यांच्या अस्तरीकरणाची तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) नियुक्त करण्याची मागणीही शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी केली. या विषयावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

release three water rotations from Jayakwadi Dam for Marathwada
Maharashtra government news : सरकार नागरिकांच्या मदतीसाठी गोळा करणार पैसा; सोसायटी स्थापन, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय...

नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक अशी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात उपलब्ध पाणीसाठाचा पुन्हा आढावा घेऊन अतिरिक्त आवर्तन देता येईल का? या संदर्भात नंतर निर्णय घेण्यात येईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.