

Beed News : मराठवाड्यातील काही जिल्ह्याना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसासह काही भागात जोरदार गारपीट झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवलदिल झाला असतानाच आता मंत्री पंकजा मुंडेंनी बीड जिल्हा प्रशासनाला मोठे आदेश दिले आहेत. गारपीटीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, असे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
मराठवाडयातील काही भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच बीड जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्ह्यात बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीची मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती घेतली. यामध्ये फळबागांसह पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.
संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारपीट देखील झाली. अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे नुकसान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.