कानाखाली लगावली तरी बांगरांचा तोरा जाईना... वेळ पडली तर पुन्हा असेच करणार

Santosh Bangar : असे अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी संतोष बांगर घाबरणारा नाही.
MLA Santosh Bangar Latest News
MLA Santosh Bangar Latest Newssarkarnama
Published on: 
Updated on: 

Santosh Bangar : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, याच मध्यान भोजन योजनेतील अन्न हे निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचा प्रकार कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भांडाफोड केला. मात्र, याबाबत जाब विचारताना बांगर यांनी थेट व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

यावर बांगर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. गोरगरिबांवर जर अन्याय होत असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल होण्याची पर्वा नाही. माझ्यासाठी अशा गोष्टा नवीन नसून मी यापुढेही करत राहणार, असे त्यांनी ठणकावले आहे. (MLA Santosh Bangar Latest News)

MLA Santosh Bangar Latest News
त्यांनी आमदारकी,मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं; मेटेंच्या आईंची प्रतिक्रिया

याबाबत बोलतांना बांगर म्हणाले की, अशा किती टीका माझ्यावर झाल्या तरी याची पर्वा नाही. जे गरीब लोक सकाळपासून कष्ट करतात आणि त्यांना जर पोटभर जेवण भेटत नसेल तर असा कायदा हातात घेणे हे काय माझ्यासाठी नवीन नाही. मी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो. ज्या गोरगरीब जनतेने मला निवडून दिले त्यांच्यासाठी झगडायचं नसेल तर मग झगडायचं कुणासाठी? यांना वारंवार सांगूनही त्यामध्ये सुधारणा होत नव्हती. यामुळे या पर्याया शिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता, असे बांगर यांनी स्पष्ट केले.

आपण आमदार असून आपण कायदेशीर दृष्ट्या न जाता कायदा हातात घेतला या माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नावर बोलताना बांगर म्हणाले की, मी जे काय बोललो त्याची रेकॉर्डिंग आहे. मी संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता. त्याला इथल्या मॅनेजरही माहित नव्हता. दिलेल्या मेनूमध्ये अनेक प्रकार आहेत. मात्र येथे प्रत्यक्षात काहीच दिसत नव्हतं. तिथे फक्त भात डाळ आणि करपलेल्या चपात्या इतकच दिसत होत्या. यावेळी बांगर यांनी आपल्या मोबाईल मधील महिला जेवत असतानांचे फोटोही दाखवले आणि या लोकांना माध्यमांनीही पाठीशी घालू नये,असे आवाहनही त्यांनी केले.

MLA Santosh Bangar Latest News
संतोष बांगर यांची सटकली : व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली

ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने या गोरगरीब लोकांना जे जेवन दिले त्याचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे. शासनाने पाच पकवान दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात तिथे खराब झालेला अन्न दिसत होत. हे मी सर्व माध्यमाला दाखवलं आहे. मला हे बघून सहन झालं नाही. मात्र मला हे नवीनही नाही. गोरगरिबांवर जर अन्याय होत असेल तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही,असे बांगरांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. तसेच पुढेही असे प्रकार आपल्याकडून घडतील का या प्रश्नावर बांगर म्हणाले, मला याची पर्वा नाही. ज्या गोरगरीब जनतेने मला निवडून दिले त्या गोरगरिबांच्या अन्यायविरुद्ध लढण्याचे काम मी शिवसेनेच्या माध्यमातून करत आहे आणि करत राहील, असे ते म्हणाले.

झालेल्या प्रकाराबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. असला प्रकार हिंगोलीतच नाही तर राज्यभरात घडत आहे. ज्या ठिकाणी हे जेवण दिलं जातं त्या ठिकाणाहून मला फोन येत असून आपण फार चांगलं केलं, असे लोक सांगत आहेत. त्यांनी 48 हजार डब्बे हिंगोली जिल्ह्यात दाखवले मात्र हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या बघितली तर 75 हजार लोकसंख्या आहे. त्यांनी 48 हजार कामगार दाखवले आहे. यामध्ये मोठी तफावत असून हा मोठा भ्रष्टाचार असून हा तपासला गेला पाहिजे. यासाठी मी आवाज उठवणार आणि आवाज उठवत राहणार. या संदर्भात मी सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहे. याबरोबरच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे. याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल होणे किंवा न होणे ही फार मोठी गोष्ट नाही. गोरगरीब लोकांसाठी अशी अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी संतोष बांगर घाबरणारा नाही.

MLA Santosh Bangar Latest News
अडीच वर्षांत काहीच न करणारे आता आम्हाला सल्ले देताहेत : फडणवीसांचा टोला..

दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल महाविकास आघाडीचे नेत्यांकडून आपल्या टीका होत आहे, गद्दार म्हटले जात आहे. आपण गुंडगिरी करत आहात असा आपल्यावर आरोप होतोय. यावर बोलताना बांगर म्हणाले की. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता काहीच काम राहिलेलं नाही. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की अन्यायाविरुद्ध जर तोंड उघडून कोणी बोलत नसेल तर कानाखाली आवाज काढून तो आवाज बुलंद केला पाहिजे होता आणि तेच मी केलं आहे, असे बांगर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com