Parbhani District Bank News : आमदार वरपुडकरांना धक्का, जिल्हा बॅंकेचे संचालकपद गेले..

Congress News : संचालक म्हणून अपात्र ठरल्याने वरपुडकर यांचे अध्यक्षपदही धोक्यात आले आहे.
Parbhani District Bank News
Parbhani District Bank NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Congress News : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांचे संचालकपद रद्दबादल करण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक जनार्दन गुट्टे यांनी यासंदर्भात दि. २० रोजी आदेश दिले आहेत. (Parbhani District Bank News) पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.

Parbhani District Bank News
Abdul Sattar News : मेळाव्याचे निमंत्रण द्यायला गेले अन् सत्तारांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले...

दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी वरपुडकर (Suresh Warpodkar) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेचे संचालकपद धारण केले आहे. मात्र या दिवशी संस्थेकडे तब्बल एक कोटीपेक्षा जास्त थकबाकी शिल्लक होती. (Parbhani) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकीदार असलेल्या संस्थेचा पदाधिकारी असल्यास त्याचे मध्यवर्ती बँकेचे संचालकपद रद्द ठरवण्यात येते.

या प्रकरणी आक्षेप दाखल झाल्यानंतर वरपुडकर यांच्यावतीने विभागीय सहनिबंधकांकडे कागदपत्रे सादर करण्यात आली. (Congress) तसेच युक्तीवादही करण्यात आला. परंतु वरपुडकर व संस्थेने दिलेल्या खुलाशासह सादर केलेली कागदपत्रे व युक्तीवाद समाधानकारक नाही, असे स्पष्ट करीत विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ (1)(फ) आणि (2) नुसार सुरेश वरपुडकर यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून अपात्र ठरविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संचालक म्हणून अपात्र ठरल्याने वरपुडकर यांचे अध्यक्षपदही धोक्यात आले आहे. अशाच प्रकारची कारवाई बँकेच्या आणखी एका संचालकावर चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यासंदर्भात लवकरच निकाल अपेक्षित आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यात लढत झाली होती. यात सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने २१ पैकी ११ जागांवर विजय मिळवला होता. तर रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितले जाते. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव निर्माण करण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांत चढाओढ असते. अध्यक्षपदावर गंडातर आल्याने सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. वरपूडकर यांचे संचालक संचालक पद रद्दबातल झाले असले तरी त्यांच्या स्नुषा प्रेरणा वरपुडकर या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी कायम आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com