Monsoon Session : `शासन आपल्या दारी`, हा कार्यक्रम म्हणजे निव्वळ दिखावा आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून केला जातो. (Ambadas Danve News) त्याता राज्य सरकारच्या नियोजन विभागाने आता या कार्यक्रमासाठी आमदारांनी आपल्या स्थानिक निधीतून २० लाख रुपये द्यावेत, असे परिपत्रक काढले आहे.
यावर दानवे यांनी आक्षेप घेत पत्रक काढण्यामागे सरकारची काय भूमिका आहे ? याचा खुलासा करण्याची मागणी केली. दानवे म्हणाले, आधीच अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निधीचे असमान वाटप केले आहे. (Shivsena) सगळा निधी हा राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या आमदारांना वाटण्यात आला आहे.
विरोधी आमदारांना निधीच देण्यात आलेला नाही. असे असतांना `शासन आपल्या दारी`, या कार्यक्रमासाठी आमदारांच्या स्थानिक निधीतून २० लाख रुपये द्यावे, असे फर्मान सरकारने काढले आहे. (Maharashtra) शासनाने या कार्यक्रमाच्या जाहीरातीवर कोट्यावधीचा खर्च केला आहे. गावागावात हे कार्यक्रम घेतले जात आहेत, पण त्यासाठी आमदारांच्या निधीतून २० लाख मागणे कितपत योग्य आहे ?
यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देतांना, `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमांना राज्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लागत आहे. विरोधक जरी या कार्यक्रमावर टीका करत असले तरी जनतेचा मात्र याला प्रतिसाद आहे.
नियोजन विभागाने जे पत्र काढले आहे, ते बंधनकारक नाही, तर ऐच्छिक आहे. ज्यांना निधी द्यावा वाटत असले त्यांनी तो द्यावा, ज्यांना द्यायचा नाही, त्यांनी देऊ नये. कुणालाही बंधनकारक करण्यात आलेले नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.