Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Ashok Chavan-Pratap Patil ChikhalikarSarkarnama

Nanded BJP : खासदार प्रताप चिखलीकरांचे विरोधक चव्हाणांच्या गोटात?

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar : त्यामुळे आत्तापासूनच अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, अशा भूमिकेत आमदार व कार्यकर्ते आहेत.
Published on

Nanded News : प्रत्येक पक्षात गटबाजी असते, तशीच गटबाजी भारतीय जनता पक्षात नांदेडमध्ये दिसून येते. गेल्या काही महिन्यांतील वेगवेगळ्या घटनांमधून ती पुढे आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन ही गटबाजी थोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे पक्षातील विरोधक आता अशोक चव्हाणांच्या गोटात सामील होण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे आगामी काळात अशोक चव्हाण व चिखलीकर ही सत्तेची दोन केंद्रे नांदेडमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्याचे राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पक्षातील आजी-माजी आमदार खासदारांची बैठक घेऊन समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Ajit Pawar Speech : ‘समोर कारटं अन्‌ मागं बायको बसलीय...नाय तर तुला सांगितलं असतं’; अजितदादांची पुन्हा मिश्किली

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम हे चार आमदार आहेत. या आमदारांचे आणि चिखलीकरांचे या ना त्या कारणाने खटके उडाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत चिखलीकर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बालाजी बच्चेवार यांनी आमदार राजेश पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. पक्षाने बालाजी बच्चेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

चिखलीकरांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांचा भक्कम आधार मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांची अशोक चव्हाणांना साथ मिळणार आहे.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Loksabha Election 2024 : आठवले शिर्डी, सोलापूर मतदारसंघासाठी अमित शाहांना भेटले; उमेदवारही केले फिक्स!

केंद्रात जर तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, तर मराठवाड्याला मंत्रिपद देण्यात येईल. अशावेळी अशोक चव्हाण यांच्या नावाला पसंती देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे आत्तापासूनच अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, अशा भूमिकेत आमदार व कार्यकर्ते आहेत.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Indapur NCP Melava : हर्षवर्धन पाटलांशी जुळवून घेण्याचा अजितदादांचा राष्ट्रवादी नेत्यांना सल्ला; ‘भूतकाळात काय घडलं, ते आता विसरा’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com